अंतरराष्ट्रीय परिचारिका दिना निमित्य माहूर येथे भारतीय मजदूर संघाच्या वतीने परिचारिकांचा सन्मान…..!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकीरण देशमुख) :- जगातील पहिल्या परिचारिका फ्लोरेंस नाइटिंगेल यांच्या जन्मदिनी अंतरराष्ट्रीय परिचारिका दिना निमित्य भारतीय मजदूर संघ संलग्न बांधकाम कामगार संघटना जिल्हा नांदेड च्या वतीने ग्रामीण रुग्णालय माहूर येथे परिचारिकांना सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही.एन. भोसले तर प्रमुख पाहुणे युवक कॉंग्रेस वैद्यकीय आघाडी सेल चे राज्य समन्वयक डॉ. निरंजन केशवे, भाजपा शहराधक्ष नगरसेवक गोपू महामुने, तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार अडकीने, डॉ.अभिजित अंबेकर, डॉ. सुषमा चौधरी, डॉ. सुप्रिया कदम, बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा सचिव संजय सुरोशे, गुरु रविदास समता परिषदेचे तालुकाध्यक्ष अॅड नितेश बनसोडे, पत्रकार राज ठाकूर, मुख्य परिचारिका श्रीमती सुंदर बोथींगे, राजकिरण देशमुख आदींची उपस्थिती होती.
यावेळी सर्वप्रथम आद्यपरिचारिका फ्लोरेंस नाईटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार अडकीने, पाहुणे युवक कॉंग्रेस वैद्यकीय आघाडी सेल चे राज्य समन्वयक डॉ. निरंजन केशवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ व्ही.एन भोसले यांनी आपल्या मनोगाताव्दारे कोरोना सारख्या महामारीच्या काळातही निष्ठापूर्वक जीवाची बाजी लावत निर्भयपणे सेवा करीत असलेल्या कार्याचा गुणगौरव केला. कार्यक्रमास सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका एल.जि. मेंडके, एम.एस. कनाके , कु. सि. एच मुधाळे, श्री. एल. एच. भिलावेकर, आर के. साबळे, के.बि. नमुलवार, श्रीमती पि.पि. नंद,श्रीमती एम.डी. येवले. श्रीमती पि.आर.कचकलवार, श्रीमती पि.बि. खरे, समुपदेशक किरण चिरडे, आरोग्य कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष एस.एस. पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा सचिव संजय सुरोशे यांनी आभार मानले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हासचिव संजय सुरोशे यांचा सत्कार करण्यात आला.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….