महाराष्ट्र दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने किनवट मध्ये रक्तदान शिबिर….
महाराष्ट्र दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने किनवट मध्ये रक्तदान शिबिर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड/किनवट (राजकीरण देशमुख) :-
महाराष्ट्र दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या किनवट शाखेच्या वतीने नगर परिषद प्रांगणात भव्य रक्तदान व प्लाझादान शिबीर घेण्यात आला. सध्याचा कोव्हिडं-१९ ची परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे, याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबीर घेण्याचे योजिले आहे, याचीच सुरुवात म्हणून किनवट शहरात गोळवलकर गुरुजी रक्त संकलन केंद्राच्या मदतीने रक्तदान व प्लाझ्मादान शिबीर पार पडले, या शिबिरात 65 रक्तदात्यांनी सहभागी होऊन स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. मागील वर्षभरात कोविडच्या काळात अभाविपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले, येत्या 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार आहे, एकदा लस घेतली कि किमान 2 महिने रक्तदान करता येत नाही. त्यामुळे लस घेण्यापूर्वी जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करावे यासाठी अभाविपने हा उपक्रम हाती घेतला आहे. यावेळी गटविकास अधिकारी धनवे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय मुरमुरे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, जिल्हा संघचालक संतोषजी तिरमनवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक नेम्मानीवार, भाजपा तालुका अध्यक्ष संदिप केंद्रे, श्रीनिवास नेम्मानीवार, अनिरुद्ध केंद्रे, उमाकांत कराळे, विठ्ठलराव मच्छर्लावार, संतोष रायेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिर यशस्वीतेसाठी अभाविप शहराध्यक्ष चंद्रकांत नेम्मानीवार, पूर्व कार्यकर्ते प्रवीण श्रीमनवार,शहरमंत्री आशुतोष बेद्रे,निकेतन सुरोशे, विनायक ठोंबरे, शुभम काळे, आदर्श राणे, शुभम कोंकलवार, श्रेयस दुल्लरवार, सुरेश साकपेल्लीवार, वैभव गरड, करण न्यालमवार, शिवकुमार शिरपुरे यांनी परिश्रम घेतले.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…