दहावीची परीक्षा रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करा… मनसे चे शुभम पिंपळकर यांची शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कडे मागणी…


दहावीची परीक्षा रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करा…
मनसे चे शुभम पिंपळकर यांची शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कडे मागणी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावा मुळे महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे . विद्यार्थ्यां कडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्यात यावे अशी मागणी मनविसेचे शुभम पिंपळकर यांनी शिक्षणमंत्री वर्षाताई यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र सरकारने दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे एकंदरीत महाराष्ट्रातील परिस्थिती बघता महाराष्ट्र सरकारच्या या निर्णया सोबत सर्व विद्यार्थी व पालक सकारात्मक आहे असे निदर्शनास येते महाराष्ट्रात असे प्रथमच घडत असावे , परंतु आजची परिस्थिती लक्षात घेता या कठोर निर्णयाबाबत सरकारचे आभार मानले पाहिजे . परंतु हा निर्णय घेत असताना अनेक बाबींचा विचार राज्य सरकारने करायला पाहिजे होता . त्यामुळे आज विद्यार्थी आणि पालकामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे . निर्णय योग्य जरी असला तरी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठे आर्थिक संकट सामान्यासमोर उभे आहे . “ खरतर कोरोना पूर्वी सुद्धा विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा शुल्क कित्तेकदा शिक्षकांनीच भरला ” आता तर परिस्थिती बेताची आहे विशेष बाब म्हणजे सामान्य नागरिक , शेतकरी , कामगार , कष्टकरी हेच आपल्या पाल्यांना शासकीय शाळेमध्ये पाठवतात. परीक्षा रद्द झाली त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत केले तर नक्किच विद्यार्थ्यांना मदत होईल त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय त्वरीत घ्यावा अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सक्रिय कार्यकर्ते शुभम पिंपळकर यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कडे पत्रा द्वारे केली.
#चौकट
कोरोना येण्याच्या पुर्वी ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क शिक्षकच भरायचे आता तर परिस्थिती फार बेताची आहे. शासन निर्णय घेतला तो योग्यच आहे त्याबद्दल दुमत नाही, परंतु योग्य ते नियोजन करून विद्यार्थ्याना परीक्षा शुल्क परत करावे :- शुभम पिंपळकर (मनविसे कार्यकर्ता यवतमाळ)

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….