खाजगी कोव्हीड रुग्णालयातील अव्वाच्या सव्वा बिलाला बसणार आळा ; जिल्हा प्रशासनाने नियुक्त केले ऑडीटर….
खाजगी कोव्हीड रुग्णालयातील अव्वाच्या सव्वा बिलाला बसणार आळा ; जिल्हा प्रशासनाने नियुक्त केले ऑडीटर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 13 :- जिल्ह्यातील खाजगी कोव्हीड रुग्णालयात भरती असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून सदर रुग्णालये अव्वाच्या सव्वा रक्कम घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या बाबीची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून खाजगी कोव्हीड रुग्णालयात ऑडीटर नियुक्त केले आहे. त्यामुळे अतिरिक्त आकारण्यात येणा-या बिलाला आता आळा बसणार असून रुग्णांना व नातेवाईकांना दिलासा मिळण्यास मदत होईल.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरीता शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यामध्ये 17 खाजगी रुग्णालयांना डेडीकेटेड कोव्हीड केअर सेंटर म्हणून मान्यता देण्यात आली आहे. सदर खाजगी रुग्णालयात भरती असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून जादा रक्कम घेतल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णांकडून कोणत्याही प्रकारचे जादा शुल्क आकारणी होऊ नये, याकरीता निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांची सनियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
तर 17 खाजगी रुग्णालयामध्ये ऑडीटर नेमण्यात आले आहेत. यात यवतमाळातील शहा हॉस्पीटल, साईश्रध्दा हॉस्पीटल, राठोड इन्सेटिव्ह केअर युनीट हॉस्पीटल, संजीवनी हॉस्पीटल, धवणे हॉस्पीटल, यवतमाळ कोव्हीड सेंटर, उजवणे हॉस्पीटल, क्रिटीकेअर हॉस्पीटल, महालक्ष्मी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, पुसद येथील मेडीकेअर हॉस्पीटल, आयकॉन हॉस्पीटल, चव्हाण हॉस्पीटल, लाईफ लाईन हॉस्पीटल, वडते हॉस्पीटल, दिग्रस येथील डॉ. संदीप दुधे हॉस्पीटल, आरोग्यधाम हॉस्पीटल आणि वणी येथील सुगम हॉस्पीटल यांचा समावेश आहे.
या खाजगी रुग्णालयामध्ये नेमण्यात आलेल्या ऑडीटरमार्फत दैनंदिन भरती होणा-या रुग्णांची माहिती घेणे, रुग्णालयातील उपलब्ध बेड संख्या, ॲक्टीव्ह रुग्ण, पॉझेटिव्ह रुग्ण, सुट्टी देण्यात आलेले रुग्ण यांची अद्ययावत माहिती ठेवणे, कोरोनाबाधित रुग्णांकडून शुक्ल आकारणी होते किंवा नाही याची पडताळणी करणे, तसेच परिपत्रकानुसार शुल्क आकारणी होत नसल्यास एकंदरीत बिलाची तपासणी करून शुल्क आकारणी निश्चित करणे, रुग्णालयातील कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णांचे देयके तपासल्याशिवाय त्यांना सुट्टी होणार नाही,याची खात्री करणे, कोरोनाबाधित रुग्णांकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून जादा रक्कम घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास तेथेच त्यांच्या तक्रारींचे निरसन करणे, तसेच याबाबतचा अहवाल वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला सादर करणे आदी कार्यवाही करण्यात येणार आहे.
सदर आदेश जिल्हाधिका-यांच्या स्वाक्षरीने 12 एप्रिल रोजी जारी करण्यात आले आहे.
०००००००

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..