राष्ट्रहित जोपासणार्या मेमन समाजाचे स्वातंत्र्य चळवळीत योगदान :- हाजी कादर दोसानी मेमन डे निमित्त मुख्यमंत्री व राज्यपालांच्या शुभेच्छा….!
राष्ट्रहित जोपासणार्या मेमन समाजाचे स्वातंत्र्य चळवळीत योगदान :- हाजी कादर दोसानी
मेमन डे निमित्त मुख्यमंत्री व राज्यपालांच्या शुभेच्छा….!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकिरण देशमुख) :- अल्पसंख्यांक समाजातील अत्यल्प समाज व व्यापारी म्हणून ओळख असलेल्या मेमन समाजाने व्यापार करताना नेहमी राष्ट्र हित जोपासले आहे. आपल्या वतन प्रति वफादारी असणे हा ईमानाचा हिस्सा आहे.या पवित्र कुराणाच्या उपदेशाचे तंतोतंत पालन करून समाजाने राष्ट्र हित जोपासले असल्याचे मत मेमन समाजाचे झोनल सेक्रेटरी हाजी कादर दोसानी यांनी व्यक्त केले आहे.
आज दिनांक ११ एप्रिल जागतिक मेमन दिनाच्या निमित्ताने छोटे खानी चर्चा सत्राचे सोशल डिस्टन्स साधत माहूर येथे आयोजन करण्यात आले होते.या वेळी नगरसेवक इलियास बावानी,यासीन बानानी,आरिफ बावानी, हशम मकरानी, जावेद बावानी,जुनेद दोसानी, डॉ.करीम,फैसल जखुरा,आश्रफ बावानी,युसुफ छायटिया,इम्रान सुरया,साजिद खाखरा,इलियास सुरय्या,साजिद अकबानी,तोफिक बावानी,फैसल बावानी यांची उपस्थिती होती.
मेमन समाजाच्या राष्ट्रहित व सामाजिक कार्याचे अनेक प्रसंग इतिहासाच्या पानावर अधोरेखित आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य चळवळीत समाजाचे प्रमुख नेता दादा आदमजी यांनी गांधीजींना फार मोठे आर्थिक योगदान देऊन स्वातंत्र्यचळवळीत मनोभावाने सहभाग नोंदविल्याचे महात्मा गांधींनी आपल्या “सच के साथी” या पुस्तकात नमूद केले आहे. तर नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेला मेमन परिवारा तील एका श्रीमंत कुटुंबाने आपली पूर्ण संपत्ती दान केल्याचे उदाहरण ही इतिहासाच्या पानावर असल्याचे हाजी कादर दोसानी यांनी सांगितले.देशात एकूण मेमन समाजाच्या ५०० जमात असून ऑल इंडिया मेमत जमात फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष इकबाल ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रविवार रोजी समाज उपयोगी विविध उपक्रम राबविण्यात आले