ब्रेक दी चेन मोहिमेबाबत व्यापाऱ्यात नाराजी ; महागावात व्यापाऱ्यांचे एसडीओंना निवेदन…

ब्रेक दी चेन मोहिमेबाबत व्यापाऱ्यात नाराजी ; महागावात व्यापाऱ्यांचे एसडीओंना निवेदन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :-
येत्या ९ एप्रिलपर्यंत दुकानांबाबत निर्णय घ्या, अन्यथा दुकाने उघडणार, असा इशारा तालुका व्यापारी महासंघाने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी देशोधडीला लागत आहे. पुन्हा कठोर निबंध लागू केल्यामुळे संतप्त झालेल्या व्यापान्यांनी येथील तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी स्वप्रिल कापडणीस यांची भेट घेऊन १ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन मागे घेण्याची विनंती केली. अन्यथा दुकाने उघडी ठेवण्याचा इशारा दिला. दुकाने बंद असल्याने लघु व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ ओढवल्याचा निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगदीश नरवाडे, संजय चिंतामणी, विजय सूर्यवंशी, सुदाम खंदारे, विजय जाधव, गजानन शिंदे, जगदीश आरगुलवार, अभय इंगोले, रफीक भाई सय्यद, अमोल राजनकर, शे. मन्नान शे. युसुफ, राजेश इंगोले आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!