लॉकडाउन वर तत्काळ पुनर्विचार करा :- जिल्हा भाजपाची मुख्यमंत्र्यांकड़े मागणी….

लॉकडाउन वर तत्काळ पुनर्विचार करा :- जिल्हा भाजपाची मुख्यमंत्र्यांकड़े मागणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ ७ एप्रिल :- कड़क निर्बंध घालन्याची भाषा बोलणाऱ्या सरकारने पुन्हा एकदा सर्वसामान्य माणसावर लॉकडाउन लादले. कुठलीही पर्यायी व्यवस्था नसलेल्या सरकारने लॉकडाउन करतांना घेतलेल्या नियमात प्रचंड विरोधाभास असल्याने सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितिन भुतड़ा यांच्या नेतृत्वा खालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनातुन केली आहे.
कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने सरकारने “ब्रेक द चैन’ च्या माध्यमातून पुन्हा एकदा लॉकडाउन जाहिर केले, मात्र आता लॉकडाउन ची पीड़ा सामान्य माणसाला सोसन्याच्या पलीकडे गेली आहे. कड़क निर्बंध आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविने अपेक्षित असताना अचानक लादल्या गेलेले लॉकडाउन सामान्य माणसाला रुचनारे नाही.
सरकारने लॉकडाउन जाहिर केले आणि लवकरच MPSC, दहावी आणि बारावीची परीक्षा आहेत. आता दुकाने बंद असल्याने शैक्षणिक साहित्य घ्यायचे कुठून? वाहतूक सुरु मात्र गाड्यांची स्पेयर पार्टची दुकाणे बंद? मोटर मैकेनिकांचे दुकान बंद ? ठराविक संख्येच्या उपस्थितीत लग्नकार्यास मान्यता, मात्र साहित्य खरेदीचे दुकान बंद? बांधकामास परवानगी, मात्र बांधकाम सहित्याचे दुकाने बंद ? अश्या एक ना अनेक त्रुटि या निर्णयात असल्याने सरकारने यावर पुनर्विचार करावा अशी मागणी भाजपा ने मुख्यमंत्र्यांकड़े केली आहे.
संक्रमित रुग्नांना कोविड बरोबरच त्यांना असलेल्या जुन्या आजारांची देखील आरोग्य यंत्रनेकड़ून काळजी घेतल्या जावी, खाजगी रुग्णालयात उपचार घेवू इच्छिणाऱ्या रुग्नांना बेड उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र मिळवून द्यावे, ज्या रुग्णाची प्रकृति स्थिर आहे आणि ज्यांच्याकडे गृह विलगिकरणात राहण्याची व्यवस्था आहे अशांना परवानगी देण्यात यावी, खाजगी रुग्नालयातील उपचाराची दर निश्चिती करण्यात यावी, हातावर पोट असलेल्या आणि निर्वासित असलेल्यांची शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी देखील निवेदनातून शासनाकडे केली आहे. यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा, आ. अशोक उईके, आ. निलय नाईक, आ. संजीव रेड्डी बोदकुरवार, आ. नामदेव ससाणे उपस्थित होते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….