भाच्याने केला सेवानिवृत्त नायब तहसीलदार मामाचा खून ; ३ तासात आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
पूर्ववैमनस्याच्या वादातून भाच्याने सेवानिवृत्त झालेल्या नायब तहसीलदार मामाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.मोहन पेंदोरकर असे मृतक सेवानिवृत्त नायब तहसीलदार यांचे नाव असून संशयित आरोपी भाचा पवन श्रीराम मंगाम रा. विश्वशांती नगर, यवतमाळ असे माथेफिरू मारेकऱ्याचे नाव आहे. आरोपीला यवतमाळ पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिफातीने यवतमाळ येथील लोहारा परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने पूर्ववैमनस्याच्या वादातून खून केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे.

याबाबत सविस्तर असे की,
महागाव तहसील कार्यालयाचे नुकतेच सेवानिवृत्त संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार यांचा मृतदेह गुरुवारी रात्री साडे आठ वाजताच्या दरम्यान फुलसावंगी रस्त्यावरील पिंपळगाव ते महागाव रस्त्या दरम्यान रक्तबंबाळ अवस्थेत मध्ये मृतदेह आढळून आला होता. मात्र हा अपघात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून वर्वण्यात आली होती. परंतु पेंदोरकर यांच्या मृतदेहाजवळ कोणतेही वाहन आढळून आलेले नाही त्यामुळे शंकेला पेव फुटले आणि खून असल्याचा संशय व्यक्त केला गेला. मृतदेह सवना येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. त्यावेळी मात्र वैद्यकीय तपासणीत मृतकाच्या पोटात धारदार शस्त्राने सपासप वार केल्याचे आढळून आल्याने डॉक्टरांनी हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला.त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले.
पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविल्याने आरोपीला यवतमाळ येथील लोहारा परिसरातून अवघ्या ३ तासात बेड्या ठोकल्या.आरोपी पवन मंगाम हा खाजगी चालक आहे. २ दिवसापूर्वी मामाच्या भेटीसाठी तो महागाव येथे आला होता.मृतकाने चारचाकी वाहन (क्र.एम एच २० सीएच ०८४०) घेतल्याने भाचा मामाला गाडी शिकवण्यासाठी फुलसावंगी रोडवर घेवून गेला.याच संधीचा फायदा घेऊन आरोपी पवन ने पूर्ववैमनस्याच्या वादातून मामाच्या पोटात कैचीने सपासप वार केले आणि तेथून चारचाकिसह यवतमाळ च्या दिशेने गेलो असल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. मृतकाची पत्नी चंदाबाई मोहन पेंदोरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महागाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून खुनात वापरण्यात आलेले वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी वालचंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विलास चव्हाण करीत आहे.
वडिलांच्या खूनात मुलगा “पवन”चा समावेश सेवानिवृत्त नायब तहसीलदार यांचा खून करणारा आरोपी पवन श्रीराम गंगाम याने २०१४ साली वडिल “श्रीराम” यांचा खून केल्याची माहिती आहे. वडिलांच्या खून प्रकरणात मुलगा पवन यांने तुरुंगवास सुद्धा भोगला आहे. पवन यांच्या हातून हा दुसरा खून असल्याने महागाव शहरात खळबळ उडाली आहे.
श्वानांचा चाहता सेवानिवृत्त अधिकारी हरपला अनेकांना कोणता ना कोणता छंद जडलेला असतो.परंतु गुरुवारी धारदार शस्त्राने खून झालेल्या सेवानिवृत्त नायब तहसीलदार मोहन पेंदोरकर यांना श्वानांना बिस्कीट खावू घालण्याचा छंद होता. दिवसभरातून २०० ते ३०० रुपयांचे बिस्कीट श्र्वानांना खावू घालण्याचा त्यांचा विक्रम होता.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..