नांदेड़ जिल्हा बँकेवर प्रा.राजेंद्र केशवे यांचा बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा…


नांदेड़ जिल्हा बँकेवर प्रा.राजेंद्र केशवे यांचा बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर/नांदेड (राजकीरण देशमुख) :-
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माहूर सेवा सोसायटी मतदार संघातील उमेदवार रिंगणात उभ्या असलेल्या निवडणुकीसाठी माहूर सेवा सोसायटी मतदार संघातून ,दत्तराव मोहिते ,बंडू पाटील भुसारे,प्रा.राजेंद्र केशवे ,डॉ.यादव रूपला जाधव यांनी अर्ज केले होते.मात्र छाननी प्रकिये दरम्यान राजेंद्र केशवे यांनी आक्षेप नोदवल्याने दत्तराव मोहिते,बंदु पाटील भुसारे यांचे अर्ज अवैध ठरले होते .तर उर्वरित डॉ.यादवराव जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतल्याने प्रा.राजेंद्र केशवे यांची बिनविरोध निवड होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती ,परंतु उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यानंतर बंडू पाटील भुसारे व दत्तराव मोहिते यांनी विभागीय सहनिबंधक तथा निवडणूक अधिकारी, यांचे कडे अपील दाखल करत आपले अर्ज चुकीने अवैध ठरवण्यात आल्याचे म्हणने सादर करून आव्हान दिले होते ,परंतु आज विभागीय सहनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दत्तराव मोहिते आणि बंडू पाटील भुसारे या दोघांची अपील फेटाळून निवडणूक अधिकारी यांनी दिलेला निर्णय कायम ठेवला आहे त्या मुळे जिल्हा बँकेवर प्रा.राजेंद्र केशवे यांचा बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला असे म्हणायला वावगे ठरणार नाही.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….