जिल्ह्यात एकाच दिवशी 1007 जण कोरोनामुक्त ; चार जणांचा मृत्यु तर 435 नव्याने पॉझेटिव्ह…
जिल्ह्यात एकाच दिवशी 1007 जण कोरोनामुक्त ; चार जणांचा मृत्यु तर 435 नव्याने पॉझेटिव्ह…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 17 :- जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी बरे होण्याचे प्रमाणसुध्दा वाढले आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी तब्बल 1007 जण कोरोनामुक्त झाले. तर जिल्ह्यात गत 24 तासात चार जणांचा मृत्यु झाला असून 435 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 1007 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 78 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 80 वर्षीय पुरुष, नेर तालुक्यातील 69 वर्षीय पुरुष आणि दिग्रस तालुक्यातील 72 वर्षीय पुरुष आहे.
बुधवारी पॉझेटिव्ह आलेल्या 435 जणांमध्ये 326 पुरुष आणि 109 महिला आहेत. यात यवतमाळातील 159, पुसद 87, दिग्रस 59, दारव्हा 49, पांढरकवडा 19, बाभुळगाव 15, उमरखेड 14, महागाव 13, नेर 5, वणी 4, आर्णि 3, झरीजामणी 2, घाटंजी 1, मारेगाव 1 आणि इतर ठिकाणचे 4 रुग्ण आहे.
बुधवारी एकूण 6181 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 435 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5746 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2418 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 22889 झाली आहे. 24 तासात 1007 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 19947 आहे. तर जिल्ह्यात एकूण 524 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 209492 नमुने पाठविले असून यापैकी 202125 प्राप्त तर 7367 अप्राप्त आहेत. तसेच 179236 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.