हिवरा व परिसरात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता येथील एकवीरा देवी संस्थान ने कोवीड सेंटर उभारणीसाठी घेतला पुढाकार…


हिवरा व परिसरात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता येथील एकवीरा देवी संस्थान ने कोवीड सेंटर उभारणीसाठी घेतला पुढाकार…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिवरा (सं) अनिल बोम्पीलवार :-
सामाजिक बांधिलकीचे जान ठेवून व अशा आपत्तीच्या काळात कोरोणा रुग्णांच्या सोयीसाठी हिवरा येथील एकवीरा देवी संस्थान ने कोवीड सेंटर साठी पुढाकार घेतला आहे. यासाठी प्रशासनाची मान्यता सुद्धा मिळाली आहे येथील सुसज्ज अशा मंगल कार्यालय च्या वास्तूत हे कोवीड सेंटर उभारले जाणार आहे यासाठी सर्व प्रकारची तयारी युद्धपातळीवर सुरू झाली आहे . उद्या दिनांक 14 मार्च पासून हे सेंटर रुग्णांच्या , उपचारासाठी चालू होणार आहे .आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली येथील रुग्णांना उपचार दिले जाणार आहे .
हिवरा गावची संस्कृतिक सामाजिक व एकतेची परंपरा ही अखंड राहिली आहे. याच माध्यमातून या कोवीड सेंटर मधील सर्व रुग्णांना जेवण चहा नाष्ट्याची व्यवस्था ही एकविरा देवी संस्थान व गावकऱ्यांच्या मदतीतून होणार आहे यासाठी अनेक दानशूर व्यक्ती स्वयंस्फूर्तीने समोर आल्या आहेत तसेच या कामात आपले योगदान देण्यासाठी गावातील अनेक युवक आरोग्य स्वयंसेवक म्हणून सेवा देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे आले आहेत.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…