दोन माजी आमदारांच्या बंगल्या समोरील रस्त्याला पडले मोठ मोठे खड्डे… स्थानिक लोकप्रतिनिधी च्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह….?

दोन माजी आमदारांच्या बंगल्या समोरील रस्त्याला पडले मोठ मोठे खड्डे…
स्थानिक लोकप्रतिनिधी च्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रहेमान चव्हान :- 9657176148
पुसद :- येथील नेताजी सुभाष चौक ते आंबेडकर चौक , मुखरे चौक , नाईक चौक , महात्मा फुले चौक पर्यंत जोडणाऱ्या मुख्य रस्त्याला पडले मोठमोठे खड्डे नाईक चौक ते महात्मा फुले चौक या मुख्य रस्त्याला लागून दोन माजी आमदार डॉ.एन. पी. हिराणी व माजी आमदार विजयराव चोंडीकर यांच्या बंगला आहे या ठिकाणी नेहमी किरकोळ अपघात होत राहतात याकडे नगर प्रशासनाने दुर्लक्ष करीत जनतेत संताप निर्माण होत आहे त्या मागील महत्त्वाचे कारण म्हणजे या प्रमुख रस्त्याला लागून दोन आमदारांचे निवासस्थान असून व पुसद न.प. मध्ये अध्यक्ष पदा वर माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहर राव नाईक यांच्या पत्नी सौ अनिता नाईक विराजमान आहे काही महिन्या अगोदर झालेल्या विधान सभा निवडणुकीच्या वेळी पुसद विधान सभा चे माजी आमदार मनोहर नाईक यांनी राजकारण मध्ये त्यांचे सुपुत्र इंद्रनील नाईक यांना आपल्या राजकीय वारसा दिला आहे त्या वेळी माजी आमदार मनोहर नाईक जनतेला भावनिकतेची साथ घालत म्हणाले की पुसद विधान सभेचे सर्वांगीण विकासा साठी माझ्या इंद्रनील नाईक यांना सांभाळून घ्या त्यांच्या या भावनिक आव्हानाला जनतेने इंद्रनील नाईक यांना पुसद विधान सभा निवडणुकीत विजय केले परंतु निवडून आल्या पासून परंतु निवडून आल्या पासून त्यांनी पुसद च्या सर्वांगीण विकासा कडे दुर्लक्ष केले आहे काही महिन्यांवर पुसद नगर परिषदेची निवडणूक येऊन ठेपली असून सुद्धा होत असलेल्या विकास कामा वर स्थानिक लोकप्रतिनिधी च्या दुर्लक्ष केल्या मुळे चिंतेचा विषय बनला आहे तसेच शहरातील सार्वजनिक रस्त्याच्या विकास काम रखडलेले असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधीत्व वर नाराजगी असल्याने यांचे पडसाद आगामी पुसद नगर परिषद निवडणुकी वर होण्याची शक्यता नाकारता येत नाही….

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….