पॉलिटिक्स स्पेशल चे भाकीत ठरले खरे … पीआरसी कडून अधिकाऱ्यांना प्रश्नांचा भडीमार ; माता मृत्यू प्रकरण मुख्य अजेंडा ; योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश
पंचायत राज समितीची महागाव पंचायत समितीला भेट
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव :
पंचायत राज विभागाने हिवरा येथील अंगणवाडी,आरोग्य केंद्राला अचानक दुपारी भेट दिली. या भेटीत अपुरा स्टाफ आढळला. तर ग्रामपंचायतीला भेट दिली असता ग्रामसेवकाला प्रश्नांची उत्तरे देता आली नसल्यामुळे शोकॉज देण्यात आली आहे. खडका येथील शाळेला भेट दिली असता कबड्डी व खोखोग्राउंडच नसल्याचे आढळल्याने पीआरसी ने संताप व्यक्त केला.महागाव पंचायत समितीत दिलेल्या पीआरसी समितीत वरोरा मतदार संघाचे आमदार प्रतिभाताई धानोरकर,उस्मानाबाद कळंब विधानसभेचे आमदार कैलास पाटील,राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे, व परभणी मतदार संघाचे आमदार मेघना बर्डीकर यांचा समावेश होता.
“पॉलिटिक्स स्पेशल” ने मागील अंकात पीआरसी महागाव पंचायत समितीत धडकणार या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. त्या बातमीचा हवाला घेवून पीआरसिने फुलसावंगी येथील माता मृत्यू प्रकरण अजेंड्यावर घेतले.या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याचे निर्देश पिआरसी पथकाने यावेळी दिले आहे.
तर परभणी येथील पंचायत समितीच्या पंचायतराज समितीचे प्रतिनिधी आमदार मेघना बोर्डीकर यांच्याशी जिल्हा परिषद बांधकाम सभापती राम देवसरकर ,पंचायत समिती सभापती अनिता चव्हाण,माजी पं स सभापती गजानन कांबळे यांनी महागाव तालुक्यातील माळ पठारावरील गावात आजही पाण्याचे प्रश्न भेडसावत आहेत तर आरोग्याचे प्रश्न व इतर प्रश्नांचा पाढाच वाचला.
पंचायत राज विभागाने महागाव येथील पंचायत समितीच्या बचत भवनमध्ये भेटी व बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना धारेवर धरून प्रश्नांचा भडीमार केल्याने अधिकारी सळो कि पळो झालेत. तालुक्यामध्ये निधी दिलेल्या शौचालयांची संख्या किती ? अपूर्ण किती पूर्ण किती ?,तालुक्यातील किती शाळांना विद्यार्थ्यांसाठी खेळांचे ग्राऊंड आहेत असा प्रश्न विचारला असता अधिकाऱ्यांची धडकीच भरली .
तर आरोग्य केंद्रांतील जिल्हा आरोग्याधिकार्यांनी किती प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्यात काहि दोष आढळून आलेत का आढळून आल्यास काय कार्यवाही केली असाही प्रश्न विचारण्यात आला असता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने फुलसावंगी पाेहडूळ काळि दौलतखान येथे भेटी दिल्याचे आरोग्य अधिकारी जब्बार पठाण यांनी सांगितले तर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या तपासणी करण्यात आल्या का याची माहिती पंचायत राज समितीच्या वतीने यावेळी घेण्यात आली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..