मा.उच्च न्यायालयाचे माझ्यावर कारवाईबाबत आदेश नाहीत ; आरोप राजकीय हेतूने प्रेरित प्रा. शिवाजी राठोड
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :
मा.उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी 9 डिसेंबर 2020 रोजी या प्रकरणात निकाल न देता हे प्रकरण विभागीय सहनिबंधक अमरावती (सहकार) यांच्याकडे फेर चौकशीसाठी पाठवले असून त्यात दोन्ही पार्टीला ॲपियर होण्यास सांगितलेले आहे त्यामुळे तेथे पुन्हा दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेऊन निर्णय देण्यात येईल.
मा. उच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्या निकालात माझ्या नावाचा कुठेही उल्लेख नसून ताशेरेसुद्धा ओढण्यात आलेले नाहीत. जिल्हा बँकेची निवडणूक तोंडावर असल्याने राजकीय हेतूने प्रेरित होऊन पराभवाच्या गडद छायेत असलेल्या विरोधकांनी बिनबुडाचे आरोप माझ्यावर केले असून तशा बातम्या देत आहेत.
गुंज येथील जिल्हा बँकेच्या शाखेसाठी भाड्याने दिलेली इमारत ॲड. महेश राठोड यांच्या नावाने असून जिल्हा बँकेने नियमाप्रमाणे या इमारतीचा भाडे करार केला आहे. बँकेच्या धोरणानुसार व स्थानिक गरज लक्षात घेता ही जागा बँकेने भाड्याने घेतलेले आहे यात कोणताही आर्थिक फायदा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.यात संचालक पदाचा गैरवापर केला असे म्हणता येणार नाही.
हिवरा येथील जिनिंग संस्थेची जमीन खरेदीचे टेंडर रितेश मोहनलाल पुरोहित खडका यांनी घेतले असून त्यांनी त खरेदीची किंमत अपसेट प्राइस पेक्षा जास्त होती त्यांची निविदा सर्वात जास्त रकमेची असल्याने सदर जमिनींची जागा खरेदी करण्याची परवानगी त्यांना दिली त्यानंतर मी त्यात त्यांची आर्थिक अडचण लक्षात घेता पार्टनर झालो.
महागाव जिनिंग ने कर्जाची रक्कम ज्यादा कपात केली म्हणून जिल्हा बँकेच्या या व्यवहाराबाबत चा विषय उच्च न्यायालयामध्ये दाखल केला व हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.निविदा कायदेशीर असल्यामुळे व सर्वात जास्त असल्यामुळे माझ्या पदाचा दुरुपयोग मी केलेला नाही.
एकंदरीतच माझ्यावर होणारे आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत.मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर ने या प्रकरणात माझ्यावर कोणतेही ताशेरे ओढले नाहीत सर्व आरोप धादांत खोटे व चुकीचे आहेत असे प्रा.शिवाजी राठोड यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….