शेतकरी आंदोलन : शरद पवारांच्या पत्राची आठवण करून देत भाजपाचा काँग्रेसवर हल्ला
रविशंकर प्रसाद यांचा पत्रकार परिषदेत विरोधकांवर निशाणा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
शेतकरी आंदोलनात विरोधक फक्त विरोधासाठी विरोध करत आहेत असा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. शरद पवारांच्या पत्राची आठवण करुन देत त्यांनी काँग्रेस, टीडीपी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या पक्षांवर टीका केली आहे. आम्ही शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि विरोधक आता दुटप्पी भूमिका घेत आहेत कारण मोदी सरकारवर टीका करायची आहे. मोदी सरकारला शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करायचं आहे. त्यासाठी हे कायदे आणले गेले आहेत. APMC च्या कायद्यात सुधारणा करण्यात यावी यासाठी शरद पवारांनीही २०१० मध्ये पत्र लिहिलं होतं. आता सोयीस्करपणे सगळ्यांना त्या वेळचा विसर पडला आहे असंही रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.


शरद पवार हे जेव्हा देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा याच मुद्द्यांवरुन त्यांनी देशाच्या सगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. बाजार समित्यांच्या कायद्यात बदल करणं आवश्यक आहे असं त्यांनी या पत्रात लिहिलं होतं. शेतकऱ्यांना कधीही त्यांचा शेतमाल विकण्याचा हक्क असला पाहिजे असंही या पत्रात त्यांनी म्हटल्याचं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.
शेतकरी नेत्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही कोणत्याही राजकीय मंचावर जाणार नाही. आम्हाला शेतकऱ्यांच्या या भूमिकेचा आदर आहे. मात्र आता काँग्रेससह इतर विरोधकांनी या आंदोलनात उडी घेतली. कारण नरेंद्र मोदींचा विरोध करायचा आहे असंही रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांसाठी जे कायदे तयार करण्यात आले आहेत ते त्याबाबत काही शेतकरी संघटनांना शंका आहेत. त्यावर सरकारची शेतकऱ्यांशी चर्चा सुरु आहे. चर्चेची फेऱ्या सरकारकडून सुरु आहेत. मात्र अचानक फक्त विरोधाला विरोध दर्शवायचा म्हणून काँग्रेससह सगळे विरोधी पक्ष या आंदोलनात उतरले आहेत असाही आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….