उपविभागीय अधिकारी कापडणीस यांची तहसिल कार्यालयात आकस्मिक भेट (शिक्षक मतदार संघाच्या मतदान केंद्राचा घेतला आढावा)
उपविभागीय अधिकारी कापडणीस यांची तहसिल कार्यालयात आकस्मिक भेट
(शिक्षक मतदार संघाच्या मतदान केंद्राचा घेतला आढावा)
महागाव:-
अमरावती शिक्षक मतदार संघाची निवडणुक १डिसेंबर रोजी होवु घातली असुन तत्पुर्वी महागाव तहसिल कार्यालयातील मतदान केंद्राचा उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी आकस्मिक भेट देवुन आढावा घेतला यावेळी त्यांनी मतदान केंद्राची तयारी बघुन प्रशासनाची प्रशंसा केली.
यावेळी महागावचे तहसीलदार नामदेवराव ईसळकर, नायब तहसिलदार डॉ. संतोष आदमुलवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जब्बार पठाण व नगर पंचायतचे अभियंता अक्षय राऊत उपस्थित होते.
महागाव तहसिल कार्यालय हे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्र म्हणुन स्थापित करण्यात आले .यामध्ये कोरोना ची पार्श्वभूमी लक्षात घेता मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांची प्रवेश द्वारावर थर्मल स्कॅनिंग,करण्यात येणार आहे. आयसोलेशन विभाग, विभागही तयार करण्यात आले आहे.या विभागाची उपविभागीय महसूल अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी पाहणी करून महागाव तहसील कार्यालयाच्या जय्यत तयारीची प्रशंसा केली.तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाची सुध्धा यावेळी पाहणी केली आहे. आरोग्य विभागाची निगडित असलेल्या व मतदारांची काळजी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत.