महागावात भाजपच्या वतीने वीज बिलाची होळी, राज्य सरकारच्या विरोधात तहसील परिसरात घोषणाबाजी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव :
ग्राहकांना लॉकडाऊन काळात मीटरची रिडींग न घेताच तीन तीन महिन्याची दुप्पट, बिल महावितरण कडून देण्यात आले होते.अव्वाच्या सव्वा वीज वितरण कंपनी कडून वीज बिल ग्राहकांना येत असल्याने वीज बिल माफ करण्यासाठी किंवा विजबिलात ५० टक्के सूट द्यावी यासाठी सोमवारी (ता.२३ ) भाजपच्या वतीने येथील तहसील परिसरात वीज बिलाची होळी करून आघाडी शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.
जिल्ह्यातील ग्राहकांना लॉकडाऊन काळात मीटरची रिडींग न घेताच तीन तीन महिन्याची दुप्पट, बिल महावितरण कडून देण्यात आले होते.तरी देखील काही ग्राहकांनी वीज तोडण्याच्या भीतीपोटी बिल भरली आहेत. काही ग्राहकांचा वापर नसतानाही एक हजार बिल देण्याऐवजी तीन- तीन हजार बिले माथी मारल्याचा आरोप देखील भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.
वीज वितरण कंपनी ग्राहकांना सक्तीने वीज बिल भरावी अन्यथा कनेक्शन तोडल्या जाईल असे महावितरण अधिकाऱ्याकडून सांगितले जात आहे.यावेळी भाजपच्या वतीने वाढीव बिल देऊन नागरिकांना त्रास देणाऱ्या व दिलेली अश्वासन न पाळणाऱ्या आघाडी सरकारच्या निषेध करून वीज बिलाची होळी करण्यात आली. यावेळी आघाडी सरकारच्या विरोधात तहसील परिसरात घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी
या आंदोलनात भाजपा आमदार नामदेव ससाणे, तालुकाध्यक्ष दीपक आडे, शहारध्यक्ष सुरेश नरवाडे, सरचिटणीस संजय पाटे,जिनिंग माजी संचालक तथा भाजपा किसान सभेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विशाल डहाळे, प्रकाश पाटील नरवाडे,माजी तालुकाध्यक्ष विलास शेबे,गजानन मोरे,मंचाकराव खंदारे,बिरबल मुडे,संतोष पवार, शेषेराव पाटील,विश्वनाथ कदम,यांचा सहभाग होता.