जिल्ह्यात 24 तासात 64 जण नव्याने पोझेटिव्ह ; 10 जण कोरोना मुक्त ; एकाचा मृत्यु…

जिल्ह्यात 24 तासात 64 जण नव्याने पोझेटिव्ह ; 10 जण कोरोना मुक्त ; एकाचा मृत्यु…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- जिल्ह्यात गत 24 तासात 64 जण पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला आहे . तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालाच्या आयसोलेशन वॉर्ड , विविध कोव्हीड केअर सेंअर आणि कोव्हीड हेल्थ सेंटर मध्ये भरती असलेले 10 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . मृतकामध्ये पुसद येथील 64 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे . जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज ( दि .2 ) एकूण 354 रिपोर्ट प्राप्त झाले . यापैकी 64 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 290 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले . जिल्ह्यात सद्यस्थितीत 363 अॅक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे . तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10290 झाली आहे
आज 10 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 9097 आहे . जिल्ह्यात आतापर्यंत 347 मृत्युची नोंद आहे . सुरवातीपासून आतापर्यंत 91817 नमुने पाठविले असून यापैकी 91435 प्राप्त तर 382 अप्राप्त आहेत . तसेच 81145 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…