पाच कोरोनाबाधितांचा मृत्यु,76 नव्याने पॉझेटिव्ह,17 जणांना सुट्टी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 25 :
जिल्ह्यात गत 24 तासात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 76 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले 17 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 55 व 42 वर्षीय पुरुष, राळेगाव शहरातील 46 वर्षीय पुरुष, पुसद शहरातील 65 वर्षीय महिला, वणी शहरातील 68 वर्षीय महिलेचा समावेश आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 76 जणांमध्ये 46 पुरुष व 30 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 28 पुरुष व 13 महिला, आर्णी शहरातील पाच पुरुष व आठ महिला, आर्णी तालुक्यातील एक पुरुष, बाभुळगाव तालुक्यातील एक पुरुष, दारव्हा शहरातील दोन पुरुष, दारव्हा तालुक्यातील दोन महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष व एक महिला, घाटंजी शहरातील एक पुरुष, घाटंजी तालुक्यातील एक महिला, नेर तालुक्यातील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील एक पुरुष, पुसद शहरातील एक पुरुष, उमरखेड शहरातील एक पुरुष व तीन महिला, वणी शहरातील दोन पुरुष व दोन महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरुषाचा समावेश आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात 611 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 679 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 7921 झाली आहे. यापैकी 6387 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 244 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 294 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 71234 नमुने पाठविले असून यापैकी 69989 प्राप्त तर 1245 अप्राप्त आहेत. तसेच 62068 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..