अतिवृष्टीबाधीत शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करा-आ. इंद्रनिल नाईक
सोयाबीन,कपाशीचे नुकसान : पुसद,महागावला फटका
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अब्दुल रहेमान चव्हाण मो-९६५७१७६१४८
पुसद:जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या पिकमालाचे पंचनामे झाले नसल्यास ते तात्काळ सर्वेक्षण करून पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत तसेच त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात यावा, अशी सूचना वजा मागणी आमदार इंद्रनिल नाईक यांनी जिल्हाधिकार्यांना केली आहे.
पुसद आणि महागाव तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन पिकास कोम फुटले. कपाशी पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी राजा हवालदील झाला आहे. हाती आलेले पिक वाया गेल्याने शेतकऱ्यांवर संकट आले आहे. या संकटामुळे शेतकऱ्यांना खचून जाऊ नये. यातून सावरण्यासाठी त्यांना तात्काळ मदत करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणांनी तात्काळ पंचनामे पूर्ण करून शेतकर्यांना वेळीच मदत देण्यासाठी कार्यवाही करावी, असेही इंद्रनिल नाईक यांनी जिल्हाधिकार्यांना पत्राद्वारे सुचित केले आहे.


सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….