सिंदखेडराजा तालुक्यातील चांगेफळ येथील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेले तीन युवक बुडाले
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिनेश मुडे मो-९७६३१२५०७२
बुलडाणा – सिंदखेडराजा तालुक्यातील चांगेफळ येथील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेले तीन युवक बुडाले घटना सोमवारी (दि. 14 सप्टें.) सकाळच्या दरम्यान घडली. तिघांपैकी गंगाराम शांतीराम भालेराव याचा मृतदेह सापडला असून अद्याप दोघे बेपत्ता आहेत. बेपत्ता तरुणांचा शोध सुरू आहे.
सिंदखेडराजा तालुक्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून बंधारे तुडुंब भरले आहेत. चांगेफळ येथील विद्रुपा नदीवरील बंधारा तुडुंब भरून वाहत आहेत. या बंधाऱ्यावर 30 वर्षीय गंगाराम शांतीराम भालेराव, जालना जिल्ह्यातील 23 वर्षीय सुरेश बांगर व ज्ञानेश्वर भालेराव हे पोहण्यासाठी गेले होते.
दरम्यान, पोहत असताना गंगाराम शांतीराम भालेराव हा युवक बुडत असताना त्याच्या घरी आलेला जालना जिल्ह्यातील पाहुणा सुरेश बांगर व ज्ञानेश्वर भालेराव हे त्याला वाचण्यासाठी गेले. मात्र, नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने तिघेही बुडाले. या तिघांपैकी गंगाराम शांतीराम भालेराव याचा मृतदेह सापडला असून अजूनही दोघे बेपत्ता आहेत. शोध कार्यासाठी बुलडाणा येथील बचाव पथक बोलविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीसांनी भेट दिली असून गावकरीही मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहचून बेपत्ता तरुणांचा शोध घेतल्या जात आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…