NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट, लातूरमधील नामांकित प्राध्यापक शिवराज मोटेगावकर CBI च्या ताब्यात…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET 2026 पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धक्कादायक मोठी माहिती समोर आली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने थेट लातूरमधील नामांकित RCC कोचिंग क्लासचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
सीबीआयच्या या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात आणि वैद्यकीय प्रवेशाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली असून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
28 अधिकाऱ्यांचे पथक आणि 8 ते 10 तास चौकशी
लातूर हे वैद्यकीय शिक्षणाच्या तयारीसाठी लातूर पॅटर्न म्हणून संपूर्ण देशात ओळखले जाते. याच लातूरमधील पेपरफुटीच्या धाग्यादोऱ्यांचा शोध घेण्यासाठी सीबीआयचे तब्बल 28 अधिकाऱ्यांचे जंगी पथक दाखल झालं होतं. या पथकाने शिवराज मोटेगावकर यांची तब्बल 8 ते 10 तास चौकशी केली. या चौकशीदरम्यान समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आणि संशयास्पद बाबी आढळल्याने अखेर सीबीआयने मोटेगावकरांना ताब्यात घेतलं.
शिवराज मोटेगावकर यांचं नाव समोर कसं आलं?
मोटेगावकर यांचं नाव सीबीआयच्या रडारवर कसं आलं, याचाही एक मोठा खुलासा झाला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातून पी. व्ही. कुलकर्णी यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. कुलकर्णी यांच्या कसून केलेल्या चौकशीतूनच शिवराज मोटेगावकर यांचं नाव समोर आलं होतं. त्यानुसार सीबीआयने लातूरमध्ये ही मोठी चक्रं फिरवली अन् त्यांची चौकशी केली. त्यानंतर आता त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
मोटेगावकरला दिल्ली कोर्टात हजर करणार
लातूरमधील पेपरफुटीच्या चौकशीसाठी आलेल्या CBI च्या 28 जणांच्या पथकाने त्यांची तब्बल 8 ते 10 तास दीर्घ चौकशी केली होती. या खळबळजनक कारवाईनंतर आता CBI चे टीम मोटेगावकरला दिल्ली कोर्टात हजर करणार आहे. शिवराज मोटेगावकर यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले असून एका पालकाने केलेल्या तक्रारीवरून हा मुख्य तपास सुरू होता.
तब्बल 42 प्रश्न NEET च्या परीक्षेत जसेच्या तसे
मोटेगावकर यांच्या इन्स्टिट्यूटने घेतलेल्या मॉक टेस्ट मधील तब्बल 42 प्रश्न थेट NEET च्या मुख्य परीक्षेत जसेच्या तसे आले होते, असा धक्कादायक आरोप या पालकाने केला होता. मुख्य परीक्षेतील प्रश्न आधीच क्लासच्या टेस्टमध्ये आल्यामुळे या संपूर्ण गैरव्यवहाराचे धागेदोरे अत्यंत खोलवर गेल्याचे स्पष्ट होत असून दिल्ली कोर्टातील हजेरीनंतर या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे पडघम; विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक तारखांची घोषणा, मतदारसंघांची संपूर्ण यादी…
विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा चटका, अकोला-वर्धा ४६ अंशावर ; चार दिवस “यलो अलर्ट”
रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट…
“साहेब काहीतरी करा, पक्षात राहणं कठीण…” अजित पवार गटाच्या आमदारांचे थेट शरद पवारांना फोन; महाराष्ट्रात मोठा भूकंप..?
जेवढं मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथ शिंदेंनी मराठा समाजासाठी केलं, ते महाराष्ट्रातील इतर सरकारांकडून झालं असं वाटत नाही :- देवेंद्र फडणवीस….
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली, त्यांच्याजागी आलेले जज पुलाते कोण..?
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट, लातूरमधील नामांकित प्राध्यापक शिवराज मोटेगावकर CBI च्या ताब्यात…