विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा चटका, अकोला-वर्धा ४६ अंशावर ; चार दिवस “यलो अलर्ट”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “उन्हाचे सर्वाधिक चटके देणारा नवतपा अजून आठ दिवसांवर असला तरी सध्याही सूर्याचा प्रकोप चांगलाच जाणवत आहे. विदर्भात रविवारीही उष्णतेचा भडका होता. अकोला व वर्ध्याचे कमाल तापमान पुन्हा ४६ अंशांवर गेले, तर उपराजधानीच्या पाऱ्यानेही जोरदार उसळी घेतली.
परभणीत आज ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.उन्हाच्या तडाख्यामुळे विदर्भातील जनजीवन विस्कळीत झाले असून एरव्ही दुपारच्या वेळी असणारी वर्दळ दिसेनाशी झाली आहे. उन्हाच्या या तडाख्यापुढे पंखे व कुलरही प्रभावहीन ठरत आहेत. रात्रीही गरमी व उकाडा जाणवत आहे.
चार दिवस ‘यलो अलर्ट’ प्रादेशिक हवामान विभागाने आणखी चार-पाच उष्णतेच्या लाटेचा विदर्भाला चटका
दिवस संपूर्ण विदर्भात उष्णलाटेचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर लवकरच नवतपा सुरू होत आहे. सध्याचे एकूणच वातावरण लक्षात घेता मे महिन्याचा उत्तरार्ध वैदर्भीयांची चांगलीच अग्निपरीक्षा घेणार आहे.
विदर्भातील कमाल तापमान
शहर तापमान
अकोला ४६.०
वर्धा ४६.०
अमरावती ४५.८
नागपूर ४४.४
मॉन्सून ‘जैसे थे’
नैॡत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) शनिवारी (ता. १६) अंदमानात आगमन झाले आहे. आग्नेय बंगालचा उपसागर, अंदमान, निकोबार बेटे, अंदमान समुद्र, आणि अरबी समुद्राच्या काही भागात मॉन्सून दाखल झाला आहे. रविवारी (ता. १७) मॉन्सूनची वाटचाल ‘जैसे थे’ होती. येत्या दोन ते तीन दिवसांत संपूर्ण अंदमान बेटांसह बंगालच्या उपसागर तसेच दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागापर्यंत मॉन्सून धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सोलापूर ४४ अंशांवर
यंदाच्या हंगामात सोलापूरच्या तापमानाने रविवारी आतापर्यंतचा उच्चांक गाठला. येथे आज कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. हवामान तज्ज्ञांच्या विश्लेषणानुसार, मे महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात पारा ४४.५ ते ४५.५ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याची दाट शक्यता आहे.
पावसाचा इशारा
धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामान, तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस आणि उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट, लातूरमधील नामांकित प्राध्यापक शिवराज मोटेगावकर CBI च्या ताब्यात…
रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट…
“साहेब काहीतरी करा, पक्षात राहणं कठीण…” अजित पवार गटाच्या आमदारांचे थेट शरद पवारांना फोन; महाराष्ट्रात मोठा भूकंप..?
जेवढं मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथ शिंदेंनी मराठा समाजासाठी केलं, ते महाराष्ट्रातील इतर सरकारांकडून झालं असं वाटत नाही :- देवेंद्र फडणवीस….
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली, त्यांच्याजागी आलेले जज पुलाते कोण..?
सुनील तटकरे, प्रफुल पटेलांचं राष्ट्रवादीतील भविष्य काय..? पक्षाकडून अखेर खुलासा, रोहित पवारांवर गंभीर आरोप….
विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा चटका, अकोला-वर्धा ४६ अंशावर ; चार दिवस “यलो अलर्ट”