मनोज जरांगेंकडून आंदोलनाची घोषणा, सदावर्ते भडकले, थेट एकनाथ शिंदेंना इशारा, तुम्ही आता….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एल्गार पुकारला असून ३० मे पासून त्यांनी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. दुसरीकडे उदय सामंत यांना भेटल्यानंतरच जरांगे पाटील यांनी उपोषणाची तारीख कशी घोषित केली?
असा सवाल उपस्थित करून जरांगे पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्ते असू शकतात, असा गंभीर आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या घोषणेवर गुणरत्न सदावर्ते यांनी संताप व्यक्त केला. सदावर्ते यांनी जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचा संबंध अधोरेखित करून त्यांच्या सांगण्यावरूनच जरांगे पाटील आंदोलन करतात, असेच अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना आवरते घ्यावे, असा इशाराही दिला.
जरांगे पाटील हे एकनाथ शिंदेंचे कार्यकर्ते, त्यांना आता आवरतं घ्यावं
सदावर्ते म्हणाले, मनोज जरांगे हे मराठा समाजाचा नेते होऊच शकत नाही. मनोज जरांगे हे कुणाचा पुढारी आहे? राजकीय लोकांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या पुढाऱ्याला काय सांगायचे?
मनोज जरांगे पाटील हे एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्ता असू शकतात. एकनाथ शिंदे यांनीच जरांगे पाटील यांना आवरते घ्यावे.
उदय सामंतांच्या भेटीनंतरच जरांगेंकडून आंदोलनाची घोषणा कशी काय?
काही दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्री उदय सामंत हे मनोज जरांगे पाटील यांना आंतरवाली सराटी येथे जाऊन भेटले. त्यानंतर आता लगेच जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलनाची घोषणा कशी झाली? सामंत मंत्री असले म्हणून काय झाले? जरांगे पाटील आत्ताच बिळातून बाहेर कसे आले? असा सवाल करीत आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार, कटोरा घेऊन उभे नाही, असे सदावर्ते म्हणाले.
केवळ मुख्यमंत्री फडणवीस यांना टार्गेट करायचंय, सामंतांना भेटून आल्यानंतरच जरांगेंची वळवळ
जरांगे संविधानिक भाषा बोलत नाही. सगळं लगेच आज आत्ता अशीच भाषा त्यांची असते. लोकशाहीत हे चालत नाही. जरांगे पाटील यांना केवळ मुख्यमंत्री फडणवीस यांना टार्गेट करायचे आहे. सामंतांना भेटल्यानंतरच जरांगे बिळातून बाहेर निघाले. वळवळ कधी करू लागले, उदय सामंतांना भेटून आल्यानंतरच ना? काय चर्चा झाली हे त्यांनी सांगावं, उदय सामंत मंत्री असले म्हणून काय झालं? एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना आवरतं घ्यावं… असे सदावर्ते म्हणाले.

शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर आता थेट गुन्हा दाखल होणार, महसूलमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश….
मोदी सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार; कोणत्या राज्यात निवडणुका..? कुणाला मिळणार संधी..?
जरांगेंचा पुन्हा एल्गार..! ३० मे पासून बेमुदत उपोषणाची घोषणा, आता काय आहे मागणी..?
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा….
“शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही…?” NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप….
पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
मनोज जरांगेंकडून आंदोलनाची घोषणा, सदावर्ते भडकले, थेट एकनाथ शिंदेंना इशारा, तुम्ही आता….