मोदी सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार; कोणत्या राज्यात निवडणुका..? कुणाला मिळणार संधी..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “भाजपला अलिकडंच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालेलं आहे. आता भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपमध्ये आता पक्षांतर्गत आणि केंद्र सरकारमध्ये मोठ्या फेरबदलांच्या चर्चांना वेग आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपचेराष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन पक्षात नवे बदल करण्याच्या तयारीत आहेत.
2024 च्या निवडणुकीत लोकसभेत स्वबळावर बहुमत न मिळाल्यानंतर भाजपाने जेडीयू आणि तेलुगु देसम पार्टी सारख्या मित्रपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केल होतं. 9 जून 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात कोणताही विस्तार किंवा फेरबदल झालेला नाही. त्यामुळे यावेळी मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
21 मे 2026 रोजी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीत मंत्रिमंडळात फेरबदल करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजप नेत्यांच्या मते, आगामी निवडणुकांच्या रणनीतीच्या दृष्टीने हा संघटनात्मक बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पक्ष 2027 मधील विधानसभा निवडणुका, राष्ट्रपती निवडणूक आणि 2029 लोकसभा निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू करत आहे.
सध्या केंद्रीय मंत्री असलेल्या काही नेत्यांच्या जागी प्रदेशाध्यक्षपद सांभाळलेल्या काही वरिष्ठ नेत्यांना संधी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अनुभवी नेत्यांकडे पक्षविस्ताराची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेश आणि पंजाबसारख्या महत्त्वाच्या राज्यांत निवडणुका होणार असल्याने मजबूत नेतृत्व आणि अचूक रणनीतीची गरज आहे, याच दृष्टीने भाजप सध्या विचार करत आहे.
2027 मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. यापैकी पाच राज्यांत भाजपाचे सरकार आधीपासूनच सत्तेत आहे. एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, ‘केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राष्ट्रीय टीममध्ये नुकत्याच निवडणुका झालेल्या राज्यांतील चेहऱ्यांना तसेच आगामी निवडणूक राज्यांना प्रतिनिधित्व दिले जाऊ शकते.

शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर आता थेट गुन्हा दाखल होणार, महसूलमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश….
मनोज जरांगेंकडून आंदोलनाची घोषणा, सदावर्ते भडकले, थेट एकनाथ शिंदेंना इशारा, तुम्ही आता….
जरांगेंचा पुन्हा एल्गार..! ३० मे पासून बेमुदत उपोषणाची घोषणा, आता काय आहे मागणी..?
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा….
“शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही…?” NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप….
पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
मोदी सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार; कोणत्या राज्यात निवडणुका..? कुणाला मिळणार संधी..?