शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिवा परिसरातून निवडून आलेल्या शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात उच्च न्यायालयात इलेक्शन रिट पिटिशन दाखल झाले आहे.
निवडणूक शपथपत्रात कथितपणे चुकीची, अपूर्ण माहिती सादर केल्याचा आरोप याचिकेत केला.
याचिकेबाबत ॲड. रोहिदास मुंडे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, संबंधित नगरसेवकांनी प्रतिज्ञापत्रात मालमत्ता, बांधकामे, आर्थिक व्यवहार तसेच इतर महत्त्वाची माहिती पूर्णपणे जाहीर केली नाही.
‘सत्य माहिती बंधनकारक’
लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील कलम ३३ए आणि कलम ३६ नुसार उमेदवाराने सत्य आणि संपूर्ण माहिती देणे बंधनकारक आहे. खोटी माहिती सादर करणे किंवा तथ्य लपविणे मतदारांची दिशाभूल करणारे कृत्य मानले जाते, असेही त्यांनी सांगितले.
सर्व आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत. न्यायालयात त्यांनी खोटी माहिती दिली आहे. न्यायालयासमोर आम्ही बाजू मांडू. निवडणुकीत त्यांचा ज्या पद्धतीने पराभव झाला, तसाच पराभव न्यायालयीन लढाईत होईल.
-ॲड. आदेश भगत, नगरसेवक, शिंदेसेना, दिवा

“राज्यात गुंडाराज सुरू..!” मतीन पटेल मालमत्ता कारवाईवर इम्तियाज जलीलांचा प्रशासनावर प्रहार….
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस ‘ॲक्शन मोड’मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार…
पंतप्रधानांच्या आवाहनाला उपमुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद! एकनाथ शिंदे आता वापरणार इलेक्ट्रिक कार; ताफ्यातही केली कपात…..
पंतप्रधानांच्या आवाहनाला उपमुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद! एकनाथ शिंदे आता वापरणार इलेक्ट्रिक कार; ताफ्यातही केली कपात
राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे..?