इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस ‘ॲक्शन मोड’मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “देशातील वाढत्या इंधन संकटाच्या आणि जागतिक आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचे आवाहन केले होते. पंतप्रधानांनी स्वतःचा ताफा कमी केला. दरम्यान, आता महाराष्ट्र सरकारही सक्रिय झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर कडक पावले उचलली आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बैठक घेणार आहेत. या बैठकीत इंधन बचतीसाठी कोणकोणते पर्याय अवलंबिता येतील यावर चर्चा करणार आहेत. यामध्ये मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करता येईल का? तसेच ऑनलाईन बैठका घेता येतील का? यावर चर्चा करणार आहेत. या बैठकीत इंधन बचतीसाठीचे कडक निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील सर्व मंत्री आणि सनदी अधिकाऱ्यांचे यापूर्वी मंजूर झालेले परदेश दौरे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासकीय कामाच्या निमित्ताने किंवा अभ्यासासाठी जे दौरे आखण्यात आले होते, त्यांना आता स्थगिती देण्यात येणार आहे.
मंत्री शंभुराज देसाईंकडून दौरा रद्द
मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला मंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. मंत्री शंभुराज देसाई यांनी आपला नियोजित पॅरिस आणि लंडन दौरा तात्काळ रद्द केला आहे. देशातील इंधन बचत मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला.
फक्त मंत्रीच नाही, तर अनेक बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांवरही या निर्णयाचा परिणाम झाला आहे. आगामी काळात होणारे विविध आंतरराष्ट्रीय करार आणि बैठका आता ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे विमान प्रवास आणि त्यावरील होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचणार आहे.

“राज्यात गुंडाराज सुरू..!” मतीन पटेल मालमत्ता कारवाईवर इम्तियाज जलीलांचा प्रशासनावर प्रहार….
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे..?
पंतप्रधानांच्या आवाहनाला उपमुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद! एकनाथ शिंदे आता वापरणार इलेक्ट्रिक कार; ताफ्यातही केली कपात…..
पंतप्रधानांच्या आवाहनाला उपमुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद! एकनाथ शिंदे आता वापरणार इलेक्ट्रिक कार; ताफ्यातही केली कपात
राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस ‘ॲक्शन मोड’मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार…