सुवेंदू अधिकारींनी घेतली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोलकाता :- “सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते
सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर आज (09 मे) सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते आणि राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत चार-पाच नावे आघाडीवर होती. अखेर शुक्रवारी सुवेंदू अधिकारी यांची विधानसभा पक्षाचे नेते म्हणून निवड झाली होती.
शपथविधी सोहळ्याला प्रमुख नेत्यांची उपस्थिती
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील प्रचंड विजयानंतर पाच दिवसांनी, शनिवारी बंगालमध्ये शपथविधी सोहळा पार पडत आहे. सुवेंदू अधिकारी हे बंगालचे नवे मुख्यमंत्री असतील. या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते आणि राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. शुक्रवारी सुवेंदू अधिकारी यांची विधानसभा पक्षाचे नेते म्हणून निवड झाली होती. गृहमंत्री अमित शाह यांनी अधिकारी यांच्या नावाची बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली.
भाजप नेत्यांकडून पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापनेला “नव्या राजकीय युगाची” सुरुवात म्हटले आहे. हा केवळ सत्तापालट नाही, तर पश्चिम बंगालमधील एका नव्या राजकीय युगाची सुरुवात आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्षाला राज्यातील आपल्या मजबूत राजकीय अस्तित्वाचा संदेश द्यायचा असल्याची भावना व्यक्त केली आहे.
काँग्रेसपासून भाजपपर्यंत; सुवेंदू अधिकारी यांचा राजकीय प्रवास चर्चेत
पश्चिम बंगालच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व म्हणून उदयास आलेले सुवेंदू अधिकारी यांचा राजकीय प्रवास अत्यंत रंजक मानला जातो. काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यापासून सुरुवात करत त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी ओळख निर्माण केली आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश करत राज्यातील प्रमुख चेहरा म्हणून स्वतःची छाप पाडली.
सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली. त्यानंतर ते तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आणि काही वर्षांतच पक्षातील प्रभावशाली नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. विशेषतः ग्रामीण बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा विस्तार करण्यात त्यांचे मोठे योगदान मानले जाते.
मात्र, २०२० मध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी मतभेद वाढल्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर अल्पावधीतच ते बंगाल भाजपचा प्रमुख चेहरा बनले.
२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम मतदारसंघातून थेट ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणूक लढवत त्यांचा पराभव केला. या विजयामुळे त्यांची राष्ट्रीय पातळीवर मोठी चर्चा झाली आणि बंगालच्या राजकारणात त्यांचे महत्त्व अधिक वाढले.
ग्रामीण पार्श्वभूमीतून मुख्यमंत्रीपदापर्यंत
पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले सुवेंदू अधिकारी हे कोलकात्यासारख्या पारंपरिक राजकीय केंद्राऐवजी ग्रामीण भागातून पुढे आलेले नेते म्हणून ओळखले जातात. गेल्या पाच दशकांनंतर ग्रामीण पार्श्वभूमीतून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचणारे ते पहिले नेते ठरले आहेत. यापूर्वी १९७० मध्ये अजय मुखर्जी हे ग्रामीण भागातून मुख्यमंत्री झाले होते.
दरम्यान, त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी कोलकातामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. ब्रिगेड परेड ग्राऊंडसह शहरातील प्रमुख भागांमध्ये हजारो पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते, जेणेकरून सोहळा शांततेत पार पडेल.

भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..
थलपती विजय यांच्यासोबत मोठा ‘गेम’! शपथविधीवर पुन्हा ग्रहण; बहुमताचं गणित कसं बिघडलं..?
भाजपा आमचा पहिला शत्रू’, सुवेंदू अधिकारींच्या शपथविधीनंतर ममता बॅनर्जींची टीका; विरोधी ऐक्याची हाक….
गोकुळच्या भ्रष्टाचारात मुख्यमंत्र्यांनी हसन मुश्रीफ यांना धुलाई यंत्रात टाकून स्वच्छ करू नये – सुप्रिया सुळे….
महाराष्ट्र, पश्चिम बंगालनंतर आता पंजाब निशाण्यावर”, आपच्या मंत्र्याला १०० कोटींच्या घोटाळ्यात ईडीकडून अटक; संतप्त प्रतिक्रिया समोर….
सुवेंदू अधिकारींनी घेतली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ….