नाईक कुटुंबियांचा 20 ते 25 कोटी रुपयांच्या सार्वजनिक जागेवर अतिक्रमण…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- “अंदाजे 5 कोटीची जागा स्वतः सौ.अनिताताई मनोहर नाईक यांनी विक्री केली. नगर परिषद हद्दीतील शेत सर्वे नंबर 132 मधील गांधी नगर ले आउट मधील रस्ता आणि खुली जागा अंदाजे 20 ते 25 कोटी किमतीची सर्वजनिक जागेवर अतिक्रमन केलेलं आहे त्यातील 4ते 5 कोटीची जागा स्वतः अनिता मनोहर नाईक यांनी बेकायदेशीर कागद पत्र तयार करून विक्री केलेली आहे अशी माहिती डॉ. मोहम्मद नदीम गटनेता काँग्रेस नगर परिषद यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले की अनिताताई मनोहरराव नाईक यांनी केलेल्या फसवणूकी बद्दलची तक्रार पोलिसांना देण्यात आलेली आहे पोलिसांकडे मी सबंधित सर्व कागदपत्रे दिलेली आहे शासकीय पातळी वर इतर आवश्यक कागद पत्राची पाहणी करून पोलीसांनी कार्यवाव्ही करावी अशी मागणी केलेली आहे.
सौ अनिता नाईक यांनी विकलेल्या सार्वजनिक जागेवर 2023 साली तत्कालीन मुख्यअधिकारी श्री किरण सुकलवाड यांनी बांधकाम परवानगी दिलेली आहे. बांधमाक परवागी अर्जदार यांनी सुद्धा आवश्यक कागद पत्रे सादर केलेली नसताना परवागी देण्यात आलेली आहे, प्रसासकीय काळ होता तेव्हा या परवानगी बाबत माहिती मिळताच ही बाब मुखाधिकाऱ्या च्या निर्द्रक्षणात आणून दिला नंन्तर सदर परवानगी अनावदानाने दिल्या गेली आहे असे लेखी स्वरूपात तत्कालीन मुख्याधिकारी यांनी दिली आहे. मुख्याधिकाऱ्याची या बेजवाबदार पणाची तक्रार सुद्धा मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या कडे केली आहे.जिल्हाधिकार्यानी या प्रकरणावर चौकशी सुरु केली आहे.नाईक कुटुंबियांनी सत्तेचा दुरुपयोग करून अतिक्रमन केलेली जागा आणि रस्ता त्वरित मोकळा करून द्यावा, आणि जागा नगर परिषदेने ताब्यात घावी. या अशयाचे निवेदन मुख्यअधिकारी आणि नगराध्यक्ष पुसद यांच्या कडे सादर केलेले आहे.
सार्वजनिक जगाच्या रक्षण करणे हे नगराध्यक्षाचे कर्तव्य आहे तेव्हा सार्वजनिक रस्ता आणि कोट्यावढी रुपयाची सार्वजनिक जागा त्वरित नगर परिषदेने घ्यावी अशे आवाहन डॉ. मोहम्मद नदीम यांनी केले आहे.
अतिक्रमन करणारे त्यांच्याच कुटुंबियांतील असल्याने त्यांना जागा रिकामी करून घेणे अडचणीचे होणार नाही आणि ते लवकरच जागा नगर परिषदेच्या ताब्यात घेतील असे एक पत्रकाराच्या प्रश्नला उत्तर देताना डॉ. मोहमद नदीम यांनी सांगितले.
30 ते 35 कोटीची सार्वजनिक मलमत्ता आहे या कडे नगर परिषदेने गंम्भीर लक्ष द्यावे व प्रशासनाने जागा ताबडतोब ताब्यात घावें असे आवाहन डॉ. मोहम्मद नदीम यांनी केले.
या वेळी पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष झिया शेख, नगरसेवक ऍड. वसीम अहेमद,नगरसेवक जब्बार लाखे,तहेसीन अहेमद, मसूद मिर्झा,गाझी ओसामा, इर्शाद कुरेशी, फिरोज खान प्रामुख्याने उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेसाठी रस्सीखेच; चार माजी खासदारांसह भुजबळांचे नाव चर्चेत, कोणाची लागणार वर्णी..?
सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर मी., सुप्रिया सुळेंचं सर्वात मोठं वक्तव्य….
‘भारत माता की जय’ बोलू पण, ‘वंदे मातरम्’ नाही, मुस्लिम नेत्याचं वादग्रस्त विधान….
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील..? ; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले….
“आता बंगालमध्ये…”; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले…?
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक….
नाईक कुटुंबियांचा 20 ते 25 कोटी रुपयांच्या सार्वजनिक जागेवर अतिक्रमण…