ममतादीदी राजीनामा न देण्याच्या भूमिकेवर ठाम, सांगितलं खरं कारण, राजकीय पेच वाढणार..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोलकाता :- “पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभवाचा सामना करावा लागला आहे. १५ वर्षांची सत्ता गमावल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आता आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे.
ममतादीदींनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा न देण्याची घोषणा केली आहे. तृणमूल काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीमध्येही ममतादींनी राजीनामा देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. विशेष म्हणजे, या बैठकीला तृणमूलच्या १० आामदारांनी दांडी मारली होती, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसची कालीघाट इथं बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये ममतादीदींनी पुन्हा एकदा राजीनामा देण्याची भूमिका मांडला. मला काढून टाका, पण मी राजीनामा देणार नाही, असं ममतदीदींनी ठणकावून सांगितलं. या बैठकीला नॅशनल जनरल सेक्रेटरी अभिषेक बनर्जी सुद्धा हजर होते.
का देणार नाही राजीनामा?
आपल्या पक्षाचा पराभव हा चुकीच्या पद्धतीने झाला आहे. भाजपने १०० जागा लुटल्या आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही. राज्यपालांनी आपल्याला पदावरून हटवावं, याची मी वाट पाहत आहे. सगळ्या विजयी आमदारांनी याचा निषेध केला पाहिजे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सगळ्या आमदारांनी काळ्या रंगाचे कपडे घालून गेलं पाहिजे, तिथे आपला निषेध नोंदवला पाहिजे, असं त्यांनी नवनिर्वाचित आमदारांना सूचना केली.
बंगालमध्ये ही ईडी आणि भाजपची आघाडी
बंगालमध्ये आता इंडिया आघाडी आणि आपला पक्ष एक झाला आहे. त्यांना मला पदावरून हटवू द्या. हा काळा दिवस झाला पाहिजे. आता आपल्याला आणखी मजबूत व्हावं लाागणार आहे. ज्यांनी आपल्याला धोका दिला, त्यांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे, मला अशा लोकांचं हसू येतंय. मी आता मोकळी आहे, मी सगळ्यांसाठी काम केलं. आपण हरलो असलो पण आपण लढलो, मी त्यांना नैतिक दृष्ट्या पराभूत केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधान मोदी हे यामध्ये सामील आहे. निवडणुकीमध्ये त्यांनी बराच मोठा घोटाळा केला आहे. लोकांना भीती घातली, धमकावलं, असा आरोपही ममतादीदींनी केला.
बैठकीला १० आमदार गैरहजर
विशेष म्हणजे, तृणमूलची ही पहिली बैठक होती. या बैठकीला १० आमदार गैरहजर असल्याचं समोर आलं. हे आमदार उत्तर बंदाल भागातले आहे. गैरहजर आमदारांबद्दल विचारले असता तृणमूलने सांगितलं की, काही आामदारांनी येणार नाही हे आधीच सांगितलं होतं. काही आमदारांच्या घरी मेडिकल इमर्जन्सी आली होती. बीरभूम, काजलमधील आमदारांना आम्ही घरीच थांबण्यास सांगितलं होतं. तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आहे. तिथल्या कुटुंबाला मदत करण्याचे आदेश दिलं आहे.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….