सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याला संधी मिळणार..? हे पाच नेते शर्यतीत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी नुकताच राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यांनतर या जागेवर दुसरा कोणता नेता जाणार याविषयी राष्ट्रवादीच्या गोटात चर्चा सुरू झाली आहे.
सध्या या जागेवर जाण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी पाहिला मिळत आहे. या जागेसाठी आनंद परांजपे, भुजबळ कुटुंबीय, मलिक कुटुंबीय, अविनाश आदिक, विक्रम काकडे अशी प्रमुख नावे इच्छूक आहेत. परंतु प्रश्न केवळ खासदारकीचा नाही पक्षात अनेक महत्वाची पदे खाली आहेत. यामध्ये सूरज चव्हाण यांना युवकाच्या अध्यक्ष पदावरून बाजूला केल्यानंतर मागील १० महिन्यांपासून युवकचे अध्यक्षपद खाली आहे. रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी राजीनामा दिल्यानंतर आता 2 महिने उलटले तरी महिला आयोग आणि म महिला प्रदेशाध्यक्ष पददेखील रिक्त आहे. इतकेच नव्हे विधानसभा निवडणुकीवेळी समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्या गोष्टीलाही आता दोन वर्ष होतं आली. मात्र, अद्याप मुंबई अध्यक्षपदीदेखील नेमणूक करण्यात आलेली नाही. सध्या या पदांसाठी सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्याकडे इच्छूकांनी गर्दी केलेली आहे. मात्र अजूनही कुणाची कुठे वर्णी लागणार याबाबत अद्याप कोणतीच स्पष्टता पक्षात आलेली नाही.
नुकताच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीत पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत तब्बल 2 लाखांपेक्षा अधिकच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. यानंतर बुधवारी त्यांनी दिल्लीत उपराष्ट्रपतींची भेट घेऊन आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला होता.
सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदारांची राज्यसभेतील संख्या 3 इतकी राहिली आहे. राज्यसभेत राष्ट्रवादीचे तीन खासदार आहेत त्यामध्ये प्रफुल पटेल, पार्थ पवार आणि नितीन काका पाटील यांचा समावेश आहे. प्रफुल पटेल 2024 मध्ये राज्यसभेचे खासदार झाले होते, त्यांचा कार्यकाळ 2030 पर्यंत राहतील. नितीनकाका पाटील यांची राज्यसभेची मुदत 2028 पर्यंत आहे. तर गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर निवडून गेलेले पार्थ पवार हे 2032 पर्यंत खासदार राहतील. मात्र, आता सुनेत्रा पवार यांच्या जागी कोणत्या नेत्याला संधी दिली जाणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….