नाशिकमधील ‘रिकाम्या खुर्च्या’ चर्चेत; शिवसेनेचे संपर्क मंत्री उदय सामंत, सुहास कांदे यांचा संताप…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नाशिक :- “नाशिकचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकमध्ये प्रथमच नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा नाशिक येथील एका हाॅटेलमध्ये घेण्यात आला.
या मेळाव्यावर शिंदे गटातील अंतर्गत गटबाजीचे सावट स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळे मेळाव्यात अनेक खुर्च्या रिकाम्या राहिल्याने संपर्क मंत्री उदय सामंत आणि संपर्कप्रमुख आमदार सुहास कांदे यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. या मेळाव्यात मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या मार्गदर्शनापेक्षा रिकाम्या खुर्च्या हा विषय अधिकच चर्चेत राहिला.
शिवसेना शिंदे गटाने पक्षवाढीसाठी आणि पक्षातील मरगळ झटकण्यासाठी जिल्हा संपर्क मंत्री म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. नाशिकचे संपर्क मंत्री म्हणून उदय सामंत यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्त सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी येथे नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. संपर्क मंत्री म्हणून उदय सामंत यांचा पहिलाच मेळावा असल्याने ते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. नाशिक महापालिकेवर भाजपने एकहाती सत्ता प्राप्त केल्यावरही त्यांनी उपमहापौरपद शिंदे गटाला देत त्यांना सत्तेत सहभागी करुन घेतले.
उपमहापौरपद न मिळाल्याने शिंदे गटाचे प्रवीण तिदमे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. ज्येष्ठ नेते अजय बोरस्ते यांच्यावर त्यांनी उघडपणे आरोप केले होते. पक्षातील ही गटबाजी नंतर काही प्रमाणात शांत झाली असली तरी उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मेळाव्यातही या गटबाजीचे पडसाद उमटले. तोच संदर्भ ठेवत, सामंत यांनी पदाधिकाऱ्यांना पक्षांतर्गत मतभेद बाजूला ठेवून शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे आणि निष्ठेने काम करण्याची गरज मांडली.शिवसेनेचे अस्तित्व हे केवळ कार्यकर्त्यांमुळेच आहे. त्यामुळे वैयक्तिक मतभेदांपेक्षा संघटनात्मक कामाला प्राधान्य द्यावे, यासाठीच या बैठकांचे सत्र सुरू असल्याचे सामंत यांनी नमूद केले. गटबाजीची कुणकुण लागल्याने सामंत यांनी पक्षाचे नुकसान करणारी प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला.
मेळाव्यात काही खुर्च्या रिकाम्या दिसल्याने उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सामंत यांच्याप्रमाणेच संपर्क नेते म्हणून नियुक्ती झालेले आमदार सुहास कांदे यांनी उघडपणे कार्यकर्त्याच्या कमी उपस्थितीविषयी संताप व्यक्त केला. शिवसेनेचे संघटन प्रत्यक्षात कमी आणि कागदावरच अधिक दिसत असल्याचे आमदार कांदे म्हणाले. महत्वाच्या मेळाव्याला पदाधिकारीच येणार नसतील तर सामान्यांपर्यंत पोहोचरणार कधी, असा प्रश्न कांदे यांनी उपस्थित केला. नाशिक जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवायची असेल तर कागदावरचे नियोजन प्रत्यक्षात आणणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
शिवसेना शिंदे गटाच्या या मेळाव्यात मंत्री उदय सामंत आणि आमदार सुहास कांदे यांनी कोणते मार्गदर्शन केले, यापेक्षा त्यांनी मेळाव्यातील अल्प उपस्थितीविषयी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले, हाच विषय उपस्थितांमध्ये अधिक चर्चेत राहिला. खुद्द संपर्क मंत्र्यांनी खडसावल्यानंतर तरी शिंदे गटातील गटबाजी कमी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….