सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोलकाता :- “पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात हिंसाचाराचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. भाजपचे दिग्गज नेते सुवेंदु अधिकारी यांचे खाजगी सचिव चंद्रनाथ रथ यांची बुधवारी रात्री उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राममध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
या खळबळजनक प्रकरणामुळे बंगालच्या राजकारणात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रनाथ रथ हे बुधवारी रात्री कोलकात्याहून मध्यमग्राम येथील आपल्या घरी परतत होते. त्यावेळी त्यांच्या कारला दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी घेरले आणि अत्यंत जवळून गोळीबार केला. चंद्रनाथ यांना तीन गोळ्या लागल्या असून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात त्यांचा सुरक्षा रक्षक आणि चालक देखील जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तपासाची चक्रे वेगवान
या प्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला असून आतापर्यंत तीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. मात्र, गोळीबार करणारा मुख्य हल्लेखोर अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे तपास चक्रांना वेग दिला आहे.
सुवेंदु अधिकारींचा संताप
सुवेंदु अधिकारी यांनी ही घटना ‘पूर्व नियोजित कट’ असल्याचे म्हटले आहे. “दोन-तीन दिवसांपासून रेकी करून हा हल्ला करण्यात आला आहे. डीजीपींनी देखील हे मान्य केले आहे की ही सुनियोजित हत्या आहे,” असा आरोप अधिकारी यांनी केला आहे. भाजपने या हत्येसाठी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरले आहे, तर टीएमसीने हे आरोप फेटाळले असून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
‘ग्लॉक ४७X’ चा वापर
तपासातील सर्वात मोठा अपडेट म्हणजे, हल्लेखोरांनी चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार करण्यासाठी ग्लॉक ४७X (Glock 47X) या आधुनिक पिस्तूलचा वापर केला होता. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारची महागडी आणि आधुनिक शस्त्रे सामान्य गुन्हेगार वापरत नाहीत. यावरून हा हल्ला एखाद्या व्यावसायिक शूटर्सनी केल्याचा संशय बळावला आहे.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….