नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक लागू नये, यासाठी सगळे प्रयत्न करत होते. काँग्रेसनंही उमेदवार उतरवला होता. परंतु, नंतर काँग्रेसनेही उमेदवार मागे घेतला असला तरी सुनेत्रा पवारांविरुद्ध २२ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.
त्यात अभिजित बिचुकले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार ) आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा मुंडे यांचाही समावेश होता.
परंतु, करूणा मुंडे यांना नोटापेक्षाही कमे मिळाली आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार २४ पैकी पहिल्या आठ राउंडमध्ये नोटाला २५१ आणि करूणा मुंडेंना फक्त ९७ मते मिळाली आहेत. सुनेत्रा पवारांना ७८ हजार ५२८ मते पाहायला मिळत आहेत. यातच आता करूणा मुंडेंची प्रतिक्रिया समोर आली आहे.
एका माध्यमांशी बोलताना करूणा मुंडे म्हणाल्या, “बारामती हा अजित पवारांना गड आहे. विजय हा सुनेत्रा पवारांचाच होणार आहे. अजित पवारांनी बारामतीत खूप काम केले आहे. माझा पराभव झाला आहे. तरी हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं… माझा विजय तेव्हाच झाला होता, जेव्हा माझ्यामुळे निवडणूक लागली होती. काँग्रेस माघार घेणार असल्याचं मला माहिती होते.”
“सुनेत्रा पवारांनी अर्ज दाखल केला, त्यादिवशीच मी सुद्धा अर्ज दाखल केला होता. त्यादिवशी माझा विजय झाला होता. ही निवडणूक बिनविरोध होणार होती. परंतु, माझ्यामुळे निवडणूक लागली. जनतेच्या मतांचा मी आदर करते. सुनेत्रा पवारांना विजयाबद्दल खूप शुभेच्छा देते. सुनेत्रा पवार महिलांना न्याय देतील, ही अपेक्षा मी करते. अजित पवारांना न्याय देण्याचा प्रयत्न सुनेत्रा पवारांनी केला पाहिजे,” असे करूणा मुंडेंनी म्हटलं.
“मी बारामतीची रहिवाशी नाही. लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक लढण्याचा निर्णय मी घेतला होता. अर्ज दाखल केला, तेव्हा पहिल्यांदाच बारामतीला गेली होती. मी विजयी झाली नाही, तरी दुसरे कोणीतरी विजयी होतील, अशी माझी अपेक्षा होती. पण, असे झाले नाही. मी सोडून सगळ्यांनी सुनेत्रा पवारांना पाठींबा दिला होता. मला किती मते पडतील, असे सांगू शकत नाही,” असे करूणा मुंडे म्हणाल्या आहेत.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश , कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…