तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चैन्नई :- “तामिळनाडू विधानसभा निवडणुकांचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. या कलानुसार राज्यात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. राज्यात विद्यमान मुख्यमंत्री स्टॅलिन यांना खुर्ची गमवावी लागताना दिसत आहे.
राज्यात सुपरस्टार विजय यांच्या टीव्हीके पक्षाला बंपर जागा मिळताना दिसत आहे. विजय यांची ही पहिलीच निवडणूक आहे. तरीही जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. सुरुवातीच्या कलात विजय यांच्या पक्षाला 102 जागा मिळताना दिसत आहे. ही फार मोठी जमेची बाजू असल्याचं सांगितलं जात आहे. एक्झिट पोलमध्ये विजय यांना झटका बसणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण मतदारांनी एक्झिट पोलचा अंदाजच उडवून लावला आहे. सुरुवातीच्या कलात टीव्हीके सत्तेत जाताना दिसत असल्याने डीएमकेच्या कार्यालयाबाहेरचा तंबू काढण्यात आला आहे.
सुरुवातीच्या कलानुसार राज्यात टीव्हीके हा सर्वा मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. टीव्हीकेला सुरुवातीच्या कलात 102 जागा मिळताना दिसत आहेत. तर एआयडीएमकेला 54 आणि सत्ताधारी डीएमकेला 70 जागा मिळताना दिसत आहे. म्हणजे सत्ताधारी डीएमके अजूनही 32 जागांनी पिछाडीवर आहे. हा स्टॅलिन यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
तंबूच उखाडला…
एक्झिट पोलमध्ये राज्यात डीएमकेची सत्ता येणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे डीएमकेला दिलासा मिळाला होता. त्या पार्श्वभूमीवर डीएमकेने आपल्या मुख्यालया बाहेर तंबू टाकला होता. तसेच कार्यकर्ते आणि नागरिकांना निकाल लाइव्ह पाहता यावा म्हणून एलईडीही लावल्या होत्या. याशिवाय कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुर्च्या आणि रेड कार्पेटही अंथरले होते. मत मोजणी सुरू झाल्यावर सुरुवातीच्या कलांमध्ये डीएमकेची सत्ता येईल असं चित्र होतं. डीएमकेचे आकडेही वाढत होते. त्यामुळे एकच जल्लोष सुरू झाला होता. पोस्टल मतांमध्ये डीएमकेने बाजी मारल्याचं दिसत होतं. नंतर ईव्हीएम मशीन उघडल्या आणि 10 वाजल्यानंतर मोठा उलट फेर झाला.
10 वाजल्यानंतर आकडे बदलले आणि डीएमकेच्या कार्यालयात चिंतेचं वातावरण पसरलं. तामिळनाडूत विजय यांच्या टीव्हीकेला सुरुवातीच्या कलात 102 जागा मिळाल्या. तर एआयडीएमकेला 54 आणि डीएमकेला 70 जागा मिळाल्या. डीएमकेला कमी जागा मिळाल्याने वातावरण सुन्न झालं. सत्ता येणार नाही, हे लक्षात आल्यानंतर पक्षाच्या मुख्यालयाबाहेरचा तंबू काढण्यास सुरुवात झाली. एलईडी टीव्हीही काढण्यास सुरुवात झाली. खुर्च्या आणि रेड कार्पेटही उचललं गेलं. कार्यकर्त्यांनीही मुख्यालयातून काढता पाय घेत घराकडे जाणं पसंत केलं. तर दुसरीकडे टीव्हीकेच्या कार्यालयाबाहेर जल्लोषाचं वातावरण होतं.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश , कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन….
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’