महागाव तालुक्यातील हिवरा पाठोपाठ तिवरंग येथे आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण ; तालुक्यात खळबळ..
पॉलिटिक्स स्पेशल
अनिल बोम्पीलवार
हिवरा :
सुरुवातीला फक्त मोठी महानगर व शहरात कोरोनाचा प्रसार होता.नंतर काही दिवसात थेट जिल्हास्तरावरून तालुकास्तरावर व तालुकास्तरावरून आता ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झपाट्याने होत आहे.महागाव तालुक्यातील प्रथम माळकिन्ही ,गावात कोरोनाचा प्रवेश झाला.त्या हळुहळु ग्रामीण भागात कोरोनानेपाय पसरणे सुरु केले. नुकताच हिवरा गावात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर नव्याने तीवरंग येथेही काल (ता.७) रोजी कोरोना चा पहिला रुग्ण आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कोरोना रुग्ण रहदारीचा परिसर पुढील संसर्ग रोखण्यासाठी तिवरंग येथील आपत्ती व्यवस्थापन समितीने तो परिसर प्रतिबंधित केला आहे. आज पर्यंत अतिशय बिनधास्त राहत असलेल्या ग्रामीण भागात आता मात्र चिंतेची लाट पसरली आहे.येणाऱ्या दिवसात ही संख्या किती पटीने वाढते व याचा उद्रेक कीती ? होईल हे आता सांगणे कठीण झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांनी आता अतिशय सजत जागृत राहणे गरजेचे झाले आहे.