पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर, भाजपची मुसंडी, कोणत्या राज्यात कोण जिंकलं..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळ या पाचही राज्यांमध्ये सोमवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.
यामध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपला (BJP) घवघवीत यश मिळाले. तर आसामध्येही भाजपने पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यश मिळवले. तर केरळमध्ये डाव्यांचा शेवटचा गड पडला असून याठिकाणी काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे. तर तामिळनाडूमध्ये विजय थलपति याच्या टीव्हीके पक्षाने मुसंडी मारत द्रमुक आणि अण्णाद्रमुकला मागे टाकले. तर पुद्दुचेरीमध्येही भाजपने यश मिळवले आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकीत मिळालेल्या या यशामुळे भाजपची देशभरातील ताकद आणखी वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप आणखी आक्रमक राजकारणाचे धोरण अवलंबू शकते. या निकालातून आता विरोधक काय धडा घेणार आणि यापुढे कशाप्रकारची रणनीती आखणार, हे पाहावे लागेल.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल
भाजप- 194
तृणमूल काँग्रेस- 93
काँग्रेस -0
डावे पक्ष- 03
इतर-2
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल
द्रमुक- 60
अण्णाद्रमुक-65
टीव्हीके-109
इतर-9
केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल
काँग्रेस-101
डावी आघाडी -37
इतर-2
Assam Election Result 2026: आसाम विधानसभा निवडणुकीचा निकाल
भाजप-98
काँग्रेस- 24
इतर-4
पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीचा निकाल
भाजप- 22
काँग्रेस-6
इतर-1
राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल
23 व्या फेरी अखेर मिळालेली मते
भाजप अक्षय कर्डिले – 115855
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 24876
वंचित संतोष चोळके- 5214
अपक्ष रावसाहेब खेवरे- 7168
23 व्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 90979 मतांनी आघाडीवर
बारामती पोटनिवडणुकीत 20 व्या फेरीनंतर ‘वहिनीं’चे एकतर्फी वर्चस्व
२१ व्या फेरी अखेर
एकूण झालेले मतदन – १०३६३
आ. वहिनींना
झालेले मतदान – १००३७
इतर मते – ३२६
२१ व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार झालेले एकूण मतदान – १,८९,६५७
इतरांना गेलेली एकूण मते – ४१५६

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….