लाडकी बहीण योजनेच्या मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट ; ‘या’ दिवशी ३००० रुपये खात्यात जमा होणार…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या थकीत हप्त्याबाबत एक मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ई-केवायसी (e-KYC) प्रकिया पूर्ण झाल्यानंतर आता लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्यांचा हप्ता कधी मिळणार?
याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा शेवटचा हप्ता जमा झाला होता. त्यानंतर आज मे महिन्याची ४ तारीख उजाडली असली, तरी अद्याप खात्यात पैसे आलेले नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, आता राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना लवकरच ‘गुड न्यूज’ मिळण्याची शक्यता आहे.
ई-केवायसीमुळे ५४ लाख महिला अपात्र; १.८९ कोटी महिलांना मिळणार लाभ
राज्य सरकारने या योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक केले होते. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे राज्यातील तब्बल ५४ लाख महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमचा बंद झाला आहे. तर आता केवळ १ कोटी ८९ लाख पात्र महिलांनाच प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांचा लाभ मिळणार आहे.
काही महिलांच्या खात्यात मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांचे हप्ते अद्याप जमा झालेले नाहीत. तर काहींना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचेही पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारी आहेत. बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असल्याने लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत, असे सांगितले जात होते. मात्र, आता निवडणुका संपल्या असून या आठवड्यातच सरकार यावर मोठा निर्णय घेणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसात राज्य सरकारची महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीत लाडक्या बहिणींच्या प्रलंबित हप्त्यांबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. सरकार दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करते.त्यामुळे येत्या १० मे पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे मिळून तब्बल ३००० रुपये एकत्र जमा होण्याची दाट शक्यता आहे. ज्या महिलांच्या खात्यात तांत्रिक अडचणींमुळे आधीचे हप्ते आलेले नाहीत, त्याबाबतही या बैठकीत निर्णय होऊन त्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पुन्हा एकदा आनंदाची बातमी धडकणार आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….