रंगराव काळे यांना विदर्भभूषण पुरस्काराने सन्मानित ; शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- दि 22 रोजी कन्या शाळा मैदान दर्यापूर येथे पार पडलेल्या रोहिणी फाउंडेशन व दैनिक विदर्भ केसरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कार्यक्रमात. प्रतिष्ठित विदर्भातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना विदर्भभूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. शिक्षण क्षेत्रामध्ये अद्वितीय कामगारी करणारे पुसद येथील श्री रंगराव काळे माजी शिक्षणाधिकारी तथा अध्यक्ष एम जे के इंग्लिश स्कूल व व्ही पी जुनियर कॉलेज बोरगडी यांचे महाराष्ट्रातील विनोदाचा बादशाह सिने कलावंत मकरंद अनासपुरे व अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत जी वानखेडे यांच्या हस्ते विदर्भातील प्रतिष्ठित विदर्भभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाची प्रमुख लाभलेले महाराष्ट्रातील विनोदाचे बादशहा सिने कलावंत मकरंद अनासपुरे हे होते तर अध्यक्ष म्हणून अमरावती जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बळवंतजी वानखेडे हे होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित दैनिक तरुण भारत चे संपादक सुधीर पाठक हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच उद्घाटक म्हणून दर्यापूर नगरपरिषदचे नगराध्यक्षा सौ मंदाकिनी भरसाकळे व प्रमुख पाहुणे म्हणून सत्यशोधक चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक प्रा. निलेश जळमकर, राष्ट्र निर्माण प्रशासकीय अकादमीचे संचालक प्राध्यापक गजानन कोरे, संत गाडगेबाबा मिशनचे संचालक गजानन देशमुख, विदर्भ केसरीचे संपादक अमोल कंटाळे, आदी उपस्थित होते. सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर दैनिक विदर्भ केसरी वर्धापन दिन पुरवणीचे प्रकाशन सोहळा सिने कलावंत मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी विदर्भातील विविध क्षेत्रातील नामवंत तसेच विशेष कार्य करणारे दहा व्यक्तींचा प्रतिष्ठित असा विदर्भभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये सर्वप्रथम पुसद येथील श्री रंगराव काळे यांचे नाव प्रामुख्याने विशेष असे शिक्षण क्षेत्रातील भरू कामगिरी बजावणारे असे माजी शिक्षण अधिकारी रंगरावजी काळे साहेब यांच्या दूरदृष्टीपूर्ण विचारसरणी, समाजाभिमुख दृष्टिकोन आणि शिक्षणाविषयी असल्याने अटळ बांधिलकीतून त्यांनी जी. एस. जे. एस. बी. एम, या शैक्षणिक संस्थेची स्थापना करून शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन नसून व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. या तत्त्वज्ञानावर त्यांनी संस्थेची भक्कम पाया भरणी केली आहे. समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण मूल्याधिष्ठित सर्वांगीण शिक्षण उपलब्ध करून देणे हेच त्यांच्या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अद्यावत अभ्यासक्रम, अनुभवी व कुशल शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी केंद्र ित अध्ययन पद्धती यांच्या साह्याने विद्यार्थ्यांना उच्च दर्जेचे शिक्षण देण्यावर सातत्याने भर दिला जातो. क्रीडा क्षेत्रातही संस्थेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. क्रिकेटसह विविध खेळांमध्ये विद्यार्थी राज्यस्तरावर सहभाग नोंदवून आपले कौशल्य सिद्ध केले आहे. असे शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय काम केल्याबद्दल श्रीरंगराव काळे यांचा विदर्भातील प्रतिष्ठित अशा विदर्भभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ केसरीचे संपादक अमोल कंठाळे यांनी केले तर संचालन आणि आभार प्रदर्शन धनंजय देशमुख यांनी केले. या कार्यक्रमासाठी हजारो प्रेषक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता आयोजन समितीचे सदस्य अमित अग्रवाल, सौरभ रहाटे, धनंजय देशमुख, अक्षय कळसकर, शुभम कंटाळे, समीक्षा चोरपगार, व रोहिणी फाऊंडेशनचे सदस्य यांनी अर्थक परिश्रम घेतले

Big Breaking ⚡ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त प्रशासकाची नियुक्ती
विधान परिषदेसाठी जिल्ह्यातून भाजपाच्या अनेकांची मोर्चेबांधणी ; मदन येरावार, ऍड निलय नाईक, उत्तमराव इंगळे, नितीन भुतडा गजानन महाराज माऊली महाकाली देवस्थान कासोळा यासह अनेकांचे नेत्यांना साकडे….
वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न….
हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
रंगराव काळे यांना विदर्भभूषण पुरस्काराने सन्मानित ; शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल….