विधान परिषदेसाठी जिल्ह्यातून भाजपाच्या अनेकांची मोर्चेबांधणी ; मदन येरावार, ऍड निलय नाईक, उत्तमराव इंगळे, नितीन भुतडा गजानन महाराज माऊली महाकाली देवस्थान कासोळा यासह अनेकांचे नेत्यांना साकडे….
रितेश पुरोहित ; 9423703831
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- “महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी कार्यक्रम जाहीर झाला असून 12 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. विधान परिषदेच्या एकूण ९ सदस्याचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार आहे त्यात उद्धव ठाकरे (उबाठा)नीलम गोऱ्हे (शिवसेना) शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी अमोल मिटकरी राष्ट्रवादी (अजित पवार) गोपीचंद पडळकर,रणजीत सिंह मोहिते पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके, रमेश कराड सर्व (भाजपा) तसेच प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार असून एकूण दहा विधान परिषदसदस्य यांची निवडणूक होणार आहे.
विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी आमदाराच्या 28 मताचा कोटा आवश्यक आहे. पक्षाचे आमदारानुसार पाच आणि पोटनिवडणूक ची एक जागा अशी एकूण ६ जागा भाजप कडे शिवसेना दोन राष्ट्रवादी अजित पवार एक आणि महाविकास आघाडी एक अशा जागा निवडून येण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेत आपली वर्णी लागावी याकरिता यवतमाळ जिल्ह्यातील भाजपाचे आजी-माजी आमदार सक्रिय झाले असून जमेल त्या पद्धतीने आपल्या गॉडफादर कडे मीच कसा सक्षम याकरता मोर्चे बांधणी करत आहेत. असे कळते की, भाजपाकडून यवतमाळ चे माजी मंत्री मदन येरावार हे मुंबईला तळ ठोकून बसले आहेत .त्याचबरोबर विधान परिषदेचे माजी आमदार ऍड. निलय नाईक हे आपल्या स्तरावर फिल्डिंग लावत आहेत. उमरखेड चे भाजपाचे माजी आमदार उत्तमराव इंगळे यांनी माजी मंत्री मदन यरावार यांच्यामार्फत फिल्डिंग लावली असल्याची विश्वासनीय बातमी आहे. तर गजानन महाराज माऊली व नितीन भुतडा हेही मुंबई मुक्कामी असून मीच कसा योग्य असे वरिष्ठांना पटवून सांगत आहेत.
मार्चमध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत अनपेक्षित पणे दूरचित्रवानी आरतीताई फुफाटे यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तयारी करा अशी बातमी प्रसिद्ध झाली परंतु ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला त्याही “राज्यसभा नही तर विधान परिषद सही” याप्रमाणे आपल्या स्तरावर प्रयत्नशील असल्याचे समजते.
हे असे असले तरी भाजपात मात्र “एक अनार सौ बिमार” अशी स्थिती आहे. भाजपाच्या वाट्याला महाराष्ट्रातून पाच जागा आहेत त्यात यवतमाळ जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळेल की नाही? हा मोठा प्रश्न आहे.
महाराष्ट्रातील अनेकांनी आपले पक्ष सोडून भाजपाची कास धरली हेही आग्रही आहेत त्याच बरोबर भाजपाच्या निष्ठावंताचे सुद्धा पुनर्वसन करणे आवश्यक आहे.
यवतमाळ जिल्ह्यात भाजपात मोठी रस्सीखेच आहे. सर्वांनी मिळून एक उमेदवार देण्याऐवजी त्यांनी आपापल्या पद्धतीने डेपुटेशन तयार करून एकमेकाचे समर्थन करण्याऐवजी एकमेकाची उणीदूनी काढत आहेत.
मीच कसा सक्षम दुसरा कसा पक्षासाठी वाईट आहे हे सांगत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. भाजपाचे उमरखेडचे नेते नितीन भुतडा यांनी जरी मोर्चे बांधणी केली असली तरी त्यांच्या पक्षातील नेते त्यांची दुसरी बाजू भक्कमपणे मांडताना दिसतात दिसत असून त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. शिस्तीच्या पक्षात मात्र सध्या बेशिस्तपणा दिसून येत आहे. आपलंच “पातरची कसं पडेल यासाठी कोणत्याही मार्गाने भाजप नेते प्रयत्नशील आहेत. यवतमाळ जिल्ह्याला जर खरंच विधान परिषद मिळाली तर माजी मंत्री मदन येरावार यांचे पारडे जड दिसत असून त्यांना विधान परिषद देऊन शिवसेनेच्या पालकमंत्र्यांना रोखण्याचे काम भाजपा करू शकते. अनेकांनी आपल्या स्तरावर फिल्डिंग लावली असून त्यात उमरखेड तालुका सर्वात पुढे आहे परंतु महाराष्ट्रातून जिल्ह्यासाठी एक जागा आणणे तेही उमरखेड साठी हे मात्र कठीण काम आहे. एकंदरीतच जिल्ह्यातून भाजपातील अनेक नेत्यांनी विधान परिषदेसाठी मोर्चेबांधणी जोरात केली आहे.

वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न….
हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
विधान परिषदेसाठी जिल्ह्यातून भाजपाच्या अनेकांची मोर्चेबांधणी ; मदन येरावार, ऍड निलय नाईक, उत्तमराव इंगळे, नितीन भुतडा गजानन महाराज माऊली महाकाली देवस्थान कासोळा यासह अनेकांचे नेत्यांना साकडे….