वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- “स्थानिक नगरपरिषद अंतर्गत हाजी रफीक अहेमद लोहार नगरपरिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ लोहार लाईन पुसदच्या शाळेत वर्ग ७वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.फारुक अहेमद उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शेख एजाज भाई टेलर यांनी हजेरी लावली.
कार्यक्रमाची सुरुवात कुरानची आयत,हम्मद,नात पाठण करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पवित्र रमजान महिन्यात पहिला रोज़ा (उपवास) व असे काही विद्यार्थ्यां ज्याने पूर्ण महिनाभर रोज़े (उपास) ठेवले असे संपूर्ण विद्यार्थ्यांना शाळेत कडून बक्षिसे देण्यात आली
तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

निरोप समारंभात विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत भावनिक क्षण अनुभवले. काही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून शिक्षक व मित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सादिक खान सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अब्दुल रब सर यांनी मानले त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. त्यावेळीस मो.शारिक सर, सादिक खान सर,अब्दुल रब सर ,वहिदा रहेमान बाजी , मुस्कान सदफ बाजी,रिजवाना तबस्सूम बाजी यांनी बहू मुल्य कार्य केले संपूर्ण सोहळा उत्साहपूर्ण व संस्मरणीय ठरला.

हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!
वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न….