‘सबका हिसाब होगा’, पंतप्रधान मोदींचा तृणमूल काँग्रेसला इशारा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “उपस्थित जनतेला मी आज नमस्कार करतो. मला सांगण्यात आलं की या ठिकाणी पाऊस सातत्याने पडतो आहे. अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे तरीही एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळे या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद द्यायला उपस्थित राहिलात यासाठी तुम्हाला मी धन्यवाद देतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
बंगालने प्रत्येक विपरीत परिस्थितीतून मार्ग काढायचा हा निर्णय बंगालच्या जनतेने घेतला आहे हे मला माहीत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या हल्दिया या ठिकाणाहून लोकांना संबोधित केलं. २३ एप्रिलला भाजपाला मतदान करुन विजयी करा असं आवाहनही नरेंद्र मोदी यांनी केलं.
टीएमसीच्या क्रूर सरकारला सत्तेतून घालवा-मोदी
बंगालच्या बंधूंनी आणि भगिनींनो आता बंगालमध्ये परिवर्तनाचं वादळ येणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या क्रूर सरकारच्या जाण्याचा हा जयघोष आहे. संपूर्ण पश्चिम बंगाल बदलाच्या मार्गावर चालतो आहे. नंदीग्राममध्ये जसा विजय मिळाला होता तसाच विजय आता पूर्ण बंगालमध्ये मिळणार आहे अशी मला खात्री आहे. बंगालची ही निवडणूक साधीसुधी निवडणूक नाही. ही निवडणूक बंगालच्या गतवैभवाची पुनर्स्थापना करणारी ठरणार आहे. विकसित बंगालचा पाया बळकट करणारी निवडणूक आहे. यातलं सर्वात मोठं पाऊल म्हणजे इथल्या क्रूर सत्ताधाऱ्यांचा पराभव. तुम्ही तो करणार ना? संपूर्ण ताकदीने तुम्ही तृणमूल काँग्रेसला पराभूत करणार ना? असं मोदींनी विचारताच उपस्थितांनी होकार दिला आणि घोषणाबाजी केली.
टीएमसी सरकारने बंगालमध्ये फक्त घुसखोरांची फॅक्टरी निर्माण केली-मोदी
विकसित बंगालसाठी इथल्या क्रूर सत्ताधीशांची खुर्ची जाणं आवश्यक आहे. भारत आज वेगाने प्रगती करतो आहे. याचाच अर्थ हा आहे की देशातली अनेक राज्यं प्रगतीपथावर आहेत. पण टीएमसीचं क्रूर सरकार हे बंगालला पाताळात गाडण्याचं काम करते आहे. बंगाल भारताच्या प्रगतीचा आधार एकेकाळी होता त्या बंगालवर अन्याय केला जातो आहे. हा अन्याय टीएमसी सरकार करतं आहे. विकासापासून बंगालला इतकं खाली आणलं आहे की ती अवस्था तुमच्यापेक्षा जास्त इतर कुणाला कळणार नाही हे तुम्हालाही ठाऊक आहे. एक काळ असा होता की हल्दियामध्ये देशभरातले लोक काम करण्यासाठी, काम शोधण्यासाठी येत असत. आज अशी अवस्था आहे की इथल्या अनेक उद्योगांना, कारखान्यांना टाळी लागली आहेत. आज इथले तरुण अंदमानला, ओदिशाला जात आहेत. कामाच्या शोधात दुसऱ्या राज्यांमध्ये जात आहेत. मात्र टीएमसी सरकारला याच्याशी घेणंदेणं नाही. तृणमूलच्या राज्यात फक्त घुसखोरांची फॅक्टरी जोरदार चालली आहे. अपराध आणि गुन्ह्यांची दुकानं चांगली चालली आहेत अशी टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्दिया या ठिकाणी केली.
स्थिर सरकार भाजपाच देऊ शकते-मोदी
टीएमसीच्या सरकारने खोटी कागदपत्रं तयार करण्याचे उद्योग केले. जनावराच्या तस्करीची इंडस्ट्री वाढवली. तृणमूल काँग्रेसंचं राजकारण हे भीतीवर आधारीत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण करा आणि सत्ता राबवा असं या सरकारचं धोरण आहे. गुंतवणूक, कारखाने हे सगळं विश्वासाने चालतं, भीतीने नाही. तृणमूल काँग्रेसने सिंडिकेटचं गुंडाराज बंगालमध्या चालवलं आहे. कमिशनखोरीशिवाय तिथे काही चालत नाही अशी टीकाही मोदींनी भाषणात केली. पण भाजपाचं सरकार आल्यानंतर हे चित्र बदलेल हा शब्द मी तुम्हाला देतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!