नॅचरल शुगरच्या दहाव्या गळीत हंगामाची सांगता ; 5 लाख 55 हजार गाळप करत विदर्भात सर्वाधिक गाळपाचा विक्रम….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
गुंज (महागाव) :- नॅचरल शुगर ॲन्ड अलाईड इंडस्ट्रीज लि., युनिट २ गुंज सवना या कारखान्याच्या दहाव्या गळीत हंगामाची सांगता १०मार्च रोजी दत्तात्रय कदम डीजीएम यांचे शुभहस्ते गव्हाण पुजन करून करण्यांत आली. यावेळी कारखान्याचे अधिकारी नामदेव तोकलवाड वर्क्स मॅनेजर, विपूल गोयल प्रोसेस मॅनेजर, दत्तात्रय केंद्रे केन मॅनेजर यांचेसह सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावर्षी नॅचरल शुगरने दहाव्या गळीत हंगामात एकूण ५ लाख ५५ हजार ६५८ मे. टन उच्चांकी गाळप करून विदर्भात सर्वाधीक गाळपाचा विक्रम केला आहे. नॅचरल उद्योग समुहाचे संस्थापक कृषिरत्न बी. बी. ठोंबरे, चेअरमन व कार्यकारी संचालक यांचे मार्गदर्शनात मागील वर्षी महागांव, पुसद व उमरखेड तालुक्यातील शेतक-यांनी ८,३०० हेक्टरच्या ऊस नोंदी कारखान्याकडे केल्यानंतर नोंदीचा संपूर्ण ऊस वेळेत गाळप करण्याचेदृष्टीने अत्यंत सक्षमपणे नियोजन केले व वाढीव गाळप क्षमतेने १२८ दिवसांत नोंदीच्या व बिगर नोंदीच्या संपूर्ण ऊसाचे गाळप पूर्ण केले आहे. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी शेतक-यांनी दाखविलेल्या प्रचंड विश्वासार्हतेमूळे नॅचरल शुगरने यावर्षी सुध्दा विदर्भात उच्चांकी गाळपाचा विक्रम केला आहे. चालू हंगामात गाळपास आलेल्या ऊसाच्या पहील्या हप्त्याची रक्कम रू. २,७००/-प्रतिटनाप्रमाणे शेतक-यांना विनाविलंब नियमीत वाटप करण्यांत आलेली असून दुस-या व अंतीम हप्त्याची रक्कम सुध्दा दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी शेतक-यांना पेरणी व ऊस मशागतीसाठी जुनच्या पहील्या आठवड्यात देण्यांत येणार असल्याचे ठोंबरे यांनी यावेळी जाहीर केले आहे.
यावर्षी लागवड केलेल्या आणि खोडवा ऊसांसाठी नॅचरल शुगरने शेतक-यांना ‘नॅचरल ऑरगॅनिक फर्टीलायझर (एनओएफ) सेंद्रीय खत अत्यंत माफक दरांत शेती विभागाचे प्रत्येक गट कार्यालयमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. यामुळे शेतक-यांचा उत्पादन खर्च कमी होवून ऊस उत्पादनांत मोठ्या प्रमाणांत वाढ होणार असल्यामुळे याचा लाभ शेतक-यांनी घेवून ऊसाचे भरघोष उत्पादन घ्यावे असे आवाहन श्री ठोंबरे यांनी यावेळी शेतक-यांना केले.कारखान्याला ऊस पुरवठा करणारे ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, तोडणी व वाहतूक कंत्राटदार तसेच ऊस तोड मजूर यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे कारखान्याने उच्चांकी गाळप करून गळीत हंगाम अत्यंत यशस्वीपणे पार पाडला. त्या बद्दल बी. बी. ठोंबरे, चेअरमन व कार्यकारी संचालक यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…