निविदा प्रक्रियेत होणाऱ्या भ्रष्टाचार विरुद्ध पुसद काँग्रेस आक्रमक….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद अंतर्गत विकासकामा साठी निविदा प्रकाशित केल्या जात आहे स्थानिक आमदार तथा मंत्र्यांच्या आशीर्वादाने निविदा प्रक्रियेत आनागोंदी सुरु असून मर्जीतील कंत्रात दाराला काम देता येईल या साठी चार- चार,पाच- पाच महिने निविदा न उघळणे, कंत्रात दाराला निविदा सादर करण्यापासुन रोखणे, कंत्रातदाराणा धमक्यादेणे, निविदा सादर करणाऱ्या कंत्रात दारा कडून वारवार कागद पत्राची मागणी करणे आणि दुसरी कागद सादर करू नका अशा प्रकारचा दबाव आणणे हे सर्व प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागात चालू आहे या मुळे मोठ्या प्रमानात भ्रष्टाचार वाढलेला आहे त्यामुळे कामाचा दर्जा राहिलेला नाही मागील वर्षभरात कंत्रात दाराकडून कामे झालेली आहेत हेअतिशय निकृष्ठ दर्जाची आहे हे उघड डोळ्याने दिसत आहे.

शसकीय विश्राम गृह पुसदच्या नवीन बांधकाम करिता सुमारे 6 महिन्या पूर्वी निविदा प्रकाशित झाली होती मात्र ती आज रोजी उघळण्यात आली नाही सदर निविदा उघळण्याबाबत दि.27 जानेवारी 2026 रोजी निवेदन देण्यात आले होते परंतु निविदा उघळणे बाबत 20 फेब्रुवारी 2026 पर्यन्त कार्यवाही झाली नाही. म्हणून पुसद तालुका व शहर काँग्रेस कमेटी तर्फे दि.23 फेब्रुवारी पासून साखळी उपोषण करणे बाबदतचा निर्णय घेतला.उपोषण सुरु झाल्या मुळे निविदा उघलण्याची कामाला धावपळ करीत सुरु झालेली आहे मात्र निविदा उघळणे हा प्रश्न आज राहिला नाही तर निविदा उघळण्या करिता कुठलेही तांत्रिक कारण नसतांना चार पाच महिन्याचा कालावधी लावल्यागेला या दिरंगाई साठी जबाबदार असलेले कर्मचारी व अधिकाऱ्या वर त्वरित कार्यवाही व्हावी या साठी साखळी उपोषणाची सुरवात केली आहे संबंधितांनी या बाबत आवश्यक ती कार्यवाव्ही त्वरित करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामास सबंधित अधिकारी जवाबदार राहील असा इशारा काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आला आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…