काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात नालासोपाऱ्यात भाजपची निदर्शने; राहुल गांधींच्या प्रतिमेचेही केले दहन…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या एआय समिट दरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेले चड्डी बनियान आंदोलन, राहूल गांधी वारंवार करत असलेली देशविरोधी विधाने याच्या निषेधार्थ नालासोपाऱ्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेचे दहन करीत निषेध व्यक्त करण्यात आला.
नालासोपारा पूर्वेच्या तुळींज रस्त्यावरील राधा-कृष्ण हॉटेल परिसरात शनिवारी सायंकाळी ६:३० वाजता मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र आले आणि त्यांनी हे आंदोलन सुरू केले. या आंदोलनादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले आणि त्यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलनातील वक्त्यांनी या घटनेचा कडाडून निषेध केला आणि ही घटना देशाची प्रतिष्ठा व सन्मान याला धक्का लावणारी असल्याचे म्हटले. ‘अशा प्रकारचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,’ अशी मागणी त्यांनी केली.
निदर्शनस्थळी वातावरण चांगलेच तापले होते, तरीही आंदोलन शांततापूर्ण मार्गाने पार पडले. ‘देशाची एकता, अखंडता आणि सन्मान टिकवण्यासाठीच आमचा हा विरोध आहे,’ असे आंदोलकांनी यावेळी स्पष्ट केले.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…