“अपघातामागे बड्या नेत्याचा हात, ‘या’ मंत्र्याचा राजीनामा घ्या”, रोहित पवारांची दिल्लीतून थेट मोदींकडे मागणी ; राहुल गांधींनाही घातलं साकडं..!

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. त्यांच्या विमानात अपघताबाबत अनेक संशय निर्माण झाले आहेत. अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवारांनी हा प्रश्न सातत्याने उचलून धरलाय.
या अपघाताबाबत अनेक प्रश्न निर्माण करून त्यांनी काही पुरावे सादर करण्याचा प्रयत्न केलाय. मुंबईत पत्रकार परिषद घेतल्यानंतर आज रोहित पवारांनी दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद देऊन या प्रकरणी त्यांनी थेट आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी नागरी उड्डाण मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.
नागरी उड्डाण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी
मुंबईतील पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी ब्लॅक बॉक्स आणि इतर तांत्रिक त्रुटी माध्यमांसमोर मांडल्या. यावेळी त्यांनी डीजीसीएतील अनेक अधिकाऱ्यांच्या तपासावरही आक्षेप घेतला. तसंच, व्हिसीआर कंपनीवर बंदी घालण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी केंद्रातील मोठ्या नेत्याचा व्हिसीआर कंपनीच्या मालकाला साथ असल्याचा आरोप केला होता. आता, याही पुढे जाऊन रोहित पवारांनी थेट केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू आहेत.
देशातील प्रभावशाली नेत्यांनी यात लक्ष घालावं
‘नागरी उड्डाण मंत्री यांच राजीनामा घेण्याची मागणी मी या पत्रकार परिषदेतून करणार आहे. या प्रकरणात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना विनंती करणार आहे’, असं रोहित पवार सुरुवातीलाच म्हणाले. तसंच, या प्रकरणामागे अत्यंत प्रभावशाली लोकांचा सहभाग असल्याचंही रोहित पवार म्हणाले.
व्हिसीएआरला कोणी वाचवत असेल तर तोही एक षडयंत्राचा भाग असू शकतो. डीजीसीएचे मोठे अधिकारी यामागे आहे, तर मला वाटतं की अजित पवारांना न्याय द्यायचा असेल तर महाराष्ट्र आणि देशातील लोक प्रयत्न करत आहेत, पण या तपासात न्याय देण्याची गरज असेल तर या देशातील प्रभावशाली लोकांनी यात लक्ष घातलं पाहिजे. कारण, तेच याप्रकरणी न्याय देऊ शकतात. कारण, या प्रकरणातील लोकही प्रभावशाली आहेत. भारताचे सर्वांत मोठे प्रभावशाली लोक नरेंद्र मोदी आणि अमित शाह हेच त्यांना न्याय देऊ शकतील. त्यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालावं. मी नरेंद्र मोदींना याविषयी इमेलद्वारे पत्र लिहिणार आहे, असं रोहित पवार म्हणाले.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…