स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न का मिळाला नाही..? RSS प्रमुख मोहन भागवत यांंचं मोठं विधान….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या अशी मागणी सातत्याने केली जात आहे. या संदर्भातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न अद्याप का मिळाला नाही? असे मोहन भागवत यांना विचारले असता ते म्हणाले की, मी त्या समितीमध्ये नाही त्यामुळे मला माहीत नाही. पण जर तो सन्मान त्यांना मिळाला तर त्या पुरस्काराचे नक्कीच महत्व वाढेल असं मोठं विधान मोहन भागवत यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त मुंबईतील वरळी सेटरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दोन दिवसीय संघ प्रवासाची 100 वर्षे नवे क्षितिज या व्याख्यान मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या पर्वात भागवत यांनी संघाची भूमिका, स्थापना आणि कार्याची माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसीया, कोकणचे संघचालक अर्जुन चांदेकर, मुंबई महानगरचे संघचालक सुरेश भगेरिया उपक्षित होते. राजकारण, कला, प्रशासन, साहित्य, मनोरंजन क्षेत्रातील मुंबईमधील 900 हून अधिक प्रतिष्ठित मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
सलमान खानसह उद्योगपतींची उपस्थिती
शनिवारी बॉलीवूड अभिनेता सलमान खानची उपस्थिती ही चर्चेची विषय ठरली. दिग्दर्शक सुभाष घई, बोनी कपूर, विपुल शहा, अनुराधा पौडवाल, अदनान सामी, हेमा मालिनी, रणबीर कपूर, खासदार उज्ज्वल निकम, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, मुंबई मेट्रोच्या एमडी अश्विनी भिडे आणि महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…