उद्धवसेनेला महापौर पदच हवे, काँग्रेस-भाजपापुढे सत्तेचा कठीण पेच, पक्षातंर्गत गटबाजी ठरतेय डोकेदुखी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीस अवघे दोन दिवस उरले असतानाही सत्तास्थापनेचे चित्र अद्याप धूसरच आहे. महापौरपद कोणाच्या गळ्यात पडणार आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संख्याबळ जुळविताना मित्रपक्षांना सामावून घेण्याचे आव्हान काँग्रेस आणि भाजपसमोर उभे ठाकले आहे.
काँग्रेस पक्षातील गटबाजीवर तोडगा निघाला असला, तरी सत्तेसाठी आवश्यक असलेले ३४ चे संख्याबळ जुळवणे सोपे राहिलेले नाही. काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढलेल्या प्रहार जनसेवा (भाशेकाप) व एआयएमआयएमचे गटनेते पप्पू देशमुख यांनी उपमहापौर पदासाठी नामांकन दाखल केले आहे. मात्र, काँग्रेसकडून या पदासाठी देण्यात आलेले राहुल चौधरी व वसंत देशमुख हे दोन्ही उमेदवार देशमुख यांना मान्य नाहीत. विशेषतः वसंत देशमुख यांच्या नावाला त्यांनी कडवा विरोध दर्शविला आहे.
उपमहापौर काँग्रेस सोडणार का?
उपमहापौरपद काँग्रेसमध्ये वडेट्टीवार गटाच्या वाट्याला गेल्याने राहुल चौधरी नामांकन मागे घेऊन वसंत देशमुख यांचे नामांकन कायम राहील, अशी तडजोड आहे. मात्र उमेदवार बदलण्याची शक्यता कमीच आहे.
अशावेळी उपमहापौर पदाच्या उमेदवारामुळे काँग्रेसच्या महापौर पदाच्या उमेदवाराला मतदान करणार नसल्याची ठाम भूमिका पप्पू देशमुख यांची आहे. अशात उद्धवसेनाही सोबत आली नाही तर काँग्रेसची अडचण होण्याची शक्यता आहे.
उद्धवसेना तटस्थ राहणार?
उद्धवसेनेच्या भूमिकेमुळे काँग्रेस व भाजप या प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. उद्धवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिन्हे यांची भाजपचे आमदार किशोर जोरगेवार, तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा सुरू आहे.
काँग्रेसने स्थायी समिती सभापतिपद तर भाजपने सव्वा-सव्वा वर्षाचा प्रस्ताव उद्धवसेनेपुढे ठेवला आहे. उद्धवसेनेला आधी महापौर हवे. स्थायी समिती सभीपती पद नकोच, अशी भूमिका आहे.
उद्धवसेनेची मागणी पूर्ण झाली नाही आणि तटस्थ राहण्याची वेळ आल्यास संख्याबळाच्या आधारावर काँग्रेससाठी सत्ता सोपी होईल, असे चित्र आहे.
गटबाजी : काँग्रेसमधील संपुष्टात, भाजपत डोके वर
काँग्रेसमधील गटबाजी संपुष्टात आली असतानाच भाजपमधील गटबाजीने डोके वर काढले आहे. भाजपश्रेष्ठींनी संगीता खांडेकर यांचे नाव महापौर पदासाठी निश्चित केले असताना सविता संदूरकर यांच्या उमेदवारीने भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
आमदार किशोर जोरगेवारांकडून पर्यायी व्यवस्था असल्याचे सांगितले जात असले तरी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मग उपमहापौरपदासाठी दोन अर्ज का नाही, असा सवाल केला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..