मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी ठाकरे गटाकडूनही उमेदवार देण्याच्या हालचाली; मातोश्रीवर बोलावली बैठक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मुंबई महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम (BMC Mayor 2026) अखेर ठरला आहे. दोन दिवसांनंतर म्हणजेच 7 फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी अर्ज स्विकारले जाणार आहेत. तर 11 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
11 फेब्रुवारी रोजीच दुपारी 12 वाजता विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं असून महापौरपादासाठी अर्ज मागे घेण्याची वेळ सभागृह भरण्याच्या 15 मिनिटं आधी असणार आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.(BMC Mayor And Deputy Mayor 2026) शिवसेना ठाकरे गट सुद्धा महापौर उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे संख्याबळ जास्त असताना सुद्धा शिवसेना ठाकरे गट सुद्धा महापौर उपमहापौर पदाचा उमेदवार देण्याची शक्यता आहे. 7 फेब्रुवारीला शिवसेना ठाकरे गट महापौर उपमहापौर पदाचा उमेदवाराचा अर्ज भरणार का? याकडे लक्ष असणार आहे, या सगळ्या संदर्भात गटनेता किशोरी पेडणेकर व इतर काही अनुभवी नगरसेवकांना बैठकीसाठी मातोश्रीवर बोलवलं असल्याची माहिती समोर आली आहे. संख्याबळ नसलं तरी महापौर उपमहापौर पदाचा अर्ज भरण्याचा ठाकरेच्या शिवसेनेचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-
भाजप – 89
शिवसेना ठाकरे गट – 65
शिवसेना – 29
काँग्रेस – 24
मनसे – 6
एमआयएम- 8
एनसीपी – 3
एसपी – 2
एनसीपी शप – 1
————-
एकूण- 227
मुंबईचं महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण जाहीर (BMC Mayor Reservation 2026) झालं आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर महिला राज असणार आहे. दरम्यान, मुंबईतील नगरसेवकांच्या संख्याबळानूसार मुंबईचा महापौर महायुतीमधील भाजपचा होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच आता मुंबईसाठी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण जाहीर झाल्यानं महापौरपदासाठी तेजस्वी घोसाळकर (Tejasvee Ghosalkar) यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता महापौरपदासाठी महायुतीच्या आणखी काही महिलांची नावंही समोर येतील. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 2 सर्वसाधरण महिलांसाठी राखीव होता. वॉर्ड क्रमांक 2 मधून शिवसेना ठाकरे गटाच्या धनश्री कोलगे यांच्याविरुद्ध तेजस्वी घोसाळकर यांची लढत झाली होती. या लढतीत भाजपकडून तेजस्वी घोसाळकर प्रचंड बहुमतांनी विजयी झाल्या होत्या.
मुंबईसाठी असे होते आतापर्यंतचे महापौर आरक्षण
2000 सर्वसाधारण; हरेश्वर पाटील
2002 एससी; महादेव देवळे
2005 सर्वसाधारण; दत्ताजी दळवी
2007 ओबीसी महिला; डॉ. शुभा राऊळ
2009 सर्वसाधारण महिला; श्रद्धा जाधव
2012 सर्वसाधारण; सुनील प्रभू
2014 एससी महिला; स्नेहल आंबेकर
2017 सर्वसाधारण; विश्वनाथ महाडेश्वर
2020 सर्वसाधारण; किशोरी पेडणेकर
2026- सर्वसाधारण

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..