मंत्रालयात सुनेत्रा यांना अजित पवारांचीच दालने, राज्य सरकारचा निर्णय ; पदभार कधी स्वीकारणार…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे मंत्रालयातील अजित पवार यांच्या वापरातील दालनेच कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी याबाबतचा शासन निर्णय प्रसृत केला. अजित पवार यांच्या कार्यालयासाठी पाचव्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यावरील दालने देण्यात आली असून तीच दालने सुनेत्रा पवार यांच्यासाठी कायम ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, सुनेत्रा पवार आपल्या पदाची सूत्रे या आठवड्याअखेरीस स्वीकारण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक आणि औकाफ ही खाती सोपवण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील सहाव्या मजल्यावरील उत्तर बाजूची कार्यालयीन जागा, सातव्या मजल्यावरील पूर्व बाजूची दालने तसेच दालन क्रमांक ७१७मधील निधी कक्षातून आत प्रवेश केल्यानंतरचा कक्ष, दालन क्रमांक ७२२ व ७२३, तसेच पाचव्या मजल्यावरील उत्तर बाजूचे दालन क्रमांक ५०३ हे कार्यालयीन दालन म्हणून वापरण्यास देण्यात आले आहे.
‘देवगिरी’ही देणार?
मलबार हिल येथील ‘देवगिरी’ हे शासकीय निवासस्थानही सुनेत्रा पवार यांच्याकडे कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते असताना अजित पवार यांचे वास्तव्य ‘देवगिरी’ येथे राहिले.
चव्हाणांना अभिवादन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी कराड येथील प्रितीसंगमावर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच कराड येथे येऊन स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले. स्व. अजित पवार यांचे आणि यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे नातेही अत्यंत जिव्हाळ्याचे होते. त्यांची आठवण या वेळी उपस्थितांना झाली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..